काँग्रेस नेते सज्जन कुमार (फोटो सौजन्य- ANI)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीमध्ये 1984 रोजी शीखविरोधात भयंकर दंगल उसळली होती. या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी अखेर शरणागती पत्करली आहे. परंतु सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांनी न्यायालयाकडे 31 डिसेंबर रोजी शरणागती न पत्करता आणखी वेळ द्यावा अशी याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने सज्जन कुमार यांची ही याचिका फेटाळून लावली असल्याने सोमवारी त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे.

शीखविरोधी दंगल प्रकरणी सज्जन कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर पाच लाख दंडही ठोठावण्यात आला होता. त्यामुळे 34 वर्षानंतर दंगलीत निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल अशी आशा बाळगली जात होती. त्यांनतर सोमवारी 31 डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत न्यायालयाने सज्जन कुमार यांना शरणागत येण्यास वेळ देऊ केला होता.(हेही वाचा- शीखविरोधात दंगल प्रकरणातील आरोपी सज्जन कुमार यांना जन्मठेप, काँग्रेसला दणका)

इंदिरा गांधी यांची निघृण हत्या दोन सुरक्षारक्षकांनी केली होती. त्यानंतर शीखविरोधात ठिकठिकाणी दंगली भडकल्या होत्या. तर दिल्लीत अमानुषपणे शीख धर्मियांची हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी 2013 रोजी सज्जन कुमार यांची मुक्तता कनिष्ठ न्यायालयाने केली होती.