दिल्लीत आज 3,797 नवे कोरोना रुग्ण, तर 99 जणांचा मृत्यू ; 16 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Ashwjeet Jagtap
|
Nov 16, 2020 11:32 PM IST
राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार, 16 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. तर, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. राज्यात रविवारी 3 हजार 65 जणांनी करोनावर मात केली असून, 2 हजार 544 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर 60 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 92.45 वर पोहचला आहे.
बीडमध्ये प्रेयसीवर अॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या पीडितेचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, कोरोना विषाणू, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.