Girl Dies At Sabarimala Temple: केरळमधील सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असताना 11 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Sabarimala Temple, Death प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia Commons, PTI)

Girl Dies At Sabarimala Temple: केरळमधील (Kerala) सबरीमाला मंदिरात (Sabarimala Temple) दर्शनासाठी लांब रांगेत उभे असताना तामिळनाडूतील (Tamil Nadu) एका 11 वर्षीय मुलीचा शनिवारी हृदयविकाराने (Heart Attack) मृत्यू झाला. वयाच्या तीन वर्षापासून या आजाराशी झुंज देत असलेली मुलगी यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीत कोसळली. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे.

प्रख्यात सबरीमाला मंदिरात सध्या भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. काही यात्रेकरू 18 तासांपर्यंत दर्शनासाठी थांबले होते. मंदिरात भाविकांनी रांग व्यवस्थेचा भंग केल्याने निराशा आणि गोंधळ उडाला. प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे, यात्रेकरूंनी बॅरिकेड्सवरून उड्या मारल्या. त्यामुळे पवित्र पायऱ्यांजवळ अनियंत्रित गर्दी झाली. (हेही वाचा -केरळच्या Sabarimala Temple बद्दल या '11' इंटरेस्टिंग गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल!)

वाढत्या गर्दीच्या चिंतेला प्रतिसाद म्हणून, केरळ देवस्वोम मंत्री के राधाकृष्णन आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष पीएस प्रशांत यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत व्हर्च्युअल रांग बुकिंग मर्यादा 10,000 ने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा - Sabarimala Temple: तालवादक शिवमणी यांना सबरीमाला सोपानमसमोर ढोल वाजवण्यावर केरळ हाय कार्टाला आक्षेप)

दरम्यान, सुरक्षा उपायांना चालना देण्यासाठी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांनिधानम येथे विशेष बचाव रुग्णवाहिका, कानिवू 108, तैनात करण्याची घोषणा केली. ज्यामुळे उपासकांच्या गर्दीत उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित वैद्यकीय मदत देण्यात येईल.