Sexually Abused | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्लीत (Delhi) एका 11 वर्षाच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याच्या सुमारे दोन आठवड्यांनंतर आज लोक नायक रुग्णालयात (Lok Nayak Hospital) त्याचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणाच्या संबंधात दोन अल्पवयीन मुलांना अटक (Arrested) केली. परंतु त्यांच्या पालकांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळाने सोडले. 12 आणि 13 वयोगटातील आरोपींना वय आणि केसमधील अपुरा वैद्यकीय पुरावा या कारणास्तव तात्पुरते सोडण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने शुक्रवारी सांगितले की, जगण्याची शक्यता कमी आहे. त्याला सेप्टिसीमिया झाला आहे आणि त्याच्या आतड्यांमध्ये छिद्र आहे. काल त्याला हृदयविकाराचा झटका आला.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, मुलगा आता आमच्यात नाही. त्याने खूप त्रास सहन केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दिल्ली पोलिसांनीही मृत्यूची पुष्टी केली. मुलाची आई म्हणाली की मुलाचा ICU मध्ये सकाळी 6.30 च्या सुमारास मृत्यू झाला.  कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्याला विटांनी मारण्यात आले आणि घराच्या टेरेसवरून ढकलून देण्यात आले.

त्यांनी सांगितले की मुलाला किडनी निकामी होणे, शरीरात संसर्ग होणे आणि अंतर्गत रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. 18-19 सप्टेंबर रोजी घडलेली घटना 22 सप्टेंबर रोजी मुलगा आजारी पडल्यानंतर आणि त्याच्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आली. आम्ही खूप त्रास सहन केला आहे. माझा मुलगा गेला आहे आणि त्याचे मारेकरी बाहेर आहेत. मला त्याच्यासाठी न्याय हवा आहे. या मुलांनी माझ्या मुलाचा अनेक दिवस छळ केला. हेही वाचा Snake News: धामण समजून मण्यार पकडला; सापाबद्दलच्या अज्ञानातून केलेल्या धाडसाने तरुणाचा जीव गेला; वर्धा येथील घटना

खरे बोलायला तो घाबरत होता. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मी असहाय आहे, आई म्हणाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी केस आणि पार्श्‍वभूमीचे बारकाईने आकलन केल्यानंतर अल्पवयीन मुलांना सोडण्यात आले.  आरोपी 16 वर्षांखालील अल्पवयीन आहेत. त्यांच्यापैकी एकाला दमा आहे आणि दुसरा गरीब घरातून आला आहे.

डीसीपी डीसीपी संजय सैन, यांनी यापूर्वी सांगितले होते की पोलिसांनी कुटुंबाशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी 24 सप्टेंबर रोजीच कथितपणे निवेदन दिले होते. विस्तृत समुपदेशनानंतर, मुलाच्या आईने खुलासा केला की मुलावर शारिरीक अत्याचार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. तत्काळ लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले आणि जेजेबीकडे पाठवण्यात आले.