Dog Attack | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Dog Attack In Amroha: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोहा (Amroha) मध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉक (Morning Walk) साठी निघालेल्या 108 वर्षीय महिलेवर भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) टोळीने हल्ला (Dog Attack) केला. अमरोहा येथे कॉलनीजवळ बुधवारी सकाळी वृद्ध महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. रामकली असं या मृत महिलेचं नाव आहे. नगर कोतवाली परिसरातील फ्रेंड्स कॉलनी येथे रामकली आपल्या कुटुंबासह राहत होती. कुत्र्यांनी महिलेचे पाय, हात आणि पोटाला चावा घेतला. ज्यामुळे महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तत्राव झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. कुटुंबीयांनी कोणतीही पोलिस कारवाई न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

प्राप्त माहितीनुसार, मृत वृद्ध महिला रामकली या अमरोहा देहाट पोलीस स्टेशन परिसरातील फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी होत्या. रामकली याठिकाणी आपली मुलं आणि सुनांसह राहत होत्या. रामकलीच्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून सध्या त्या त्यांचा धाकटा मुलगा रामचंद्र यांच्याजवळ वेगळ्या खोलीत राहत होत्या. (हेही वाचा - Dog Attack in US: पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू, अमेरिकेतील घटना)

वाढत्या वयाबरोबर रामकलीही मानसिकदृष्ट्या कमकुवत झाल्या होत्या. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रामकली अचानक घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. (हेही वाचा -Dog Attack in Madhya Pradesh: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना)

दरम्यान, बुधवारी सकाळी कॉलनीजवळ रामकली यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याचे हात, पाय आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या होत्या. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा रामकली घरातून निघून गेल्या तेव्हा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात घटनेत रामकली यांचा जागीच मृत्यू झाला.