Dog Attack in Madhya Pradesh: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्यात एका 2 वर्षाच्या मुलीचा कुत्र्यांच्या चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dog Attack in Madhya Pradesh: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना
Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

Dog Attack in Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन जिल्ह्यात एका 2 वर्षाच्या मुलीचा कुत्र्यांच्या चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी परिसरात असलेल्या बांधकाम साईटजवळ खेळत होती. त्यावेळी अचानक भटक्या कुत्र्याने मुलीवर हल्ला केला आणि हल्ल्यात मुलीच्या अंगावर चावा घेतला. ही घटना सोमवारी उशिरा रात्री मंगळूर रोडवर घडली. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा हल्ला वाढत आहे.  (हेही वाचा-तब्बल 15 कुत्र्यांनी चढवला हल्ला, महिलेने वाचवले स्वत:चे प्राण, भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन जिल्ह्यातील उपडी गावाचे रहिवासी संजय यांच्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला झाला. संजय हे बांधकाम साईटवर पाहरेकरी म्हणून काम करत होते. आपल्या कुटुंबासोबत ते तिथेच राहत होते. रात्रीच्या वेळीस संजय आणि त्यांची पत्नी कामात गुंतले होते. त्यावेळी मुलगी एकटी बाहेर खेळत होती.मुलगी खेळत असताना काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी मुलीला 100 मीटर पर्यंत ओढून नेले. ती गंभीर जखमी झाले.

पालकांना लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णलयात उपाचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन अमरसिंह चौहान यांनी सांगितले की, मुलीच्या छातीला आणि कंबेरला गंभीर दुखापत झाली होती, कुत्र्यांनी हल्ला केला आणि चावा घेतला त्यामुळे तीचे प्राण वाचू शकले नाही. या घटनेनतंर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).