Zomato : पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू; झोमॅटोने रेस्टॉरंटला ग्राहकांच्या लीस्टमधून हटवले, मालकही बॅन
Photo Credit - Instagram

Zomato : पटियालामध्ये बर्थडे केक खाल्ल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीने खाल्लेला केक झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून मागवला होता. त्यानंतर, कंपनीने रविवारी त्यांची प्रतिक्राया देत रेस्टॉरंटला त्यांच्या लीस्टमधून काढून टाकल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्यानंतर, कंपनीने म्हटले आहे की ते “पटियाला येथे घडलेल्या घटनेने आम्ही दुःखी आहोत. आम्ही सर्वच हादरलो आहोत”. “आम्हाला या घटनेची माहिती मिळताच, आम्ही ताबडतोब झोमॅटोच्या लिस्टवरून रेस्टॉरंट हटवले आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे. (हेही वाचा :Tech Layoffs March 2024: टेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर संकट! मार्चमध्ये Apple, Dell, IBM सह अनेक कंपन्यांनी केली नोकर कपात )

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही या प्रकरणात पोलीसांना आमचं पूर्ण सहकार्य देत आहोत,”. वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 273 आणि 304-A अंतर्गत गुन्हा दाखल केला. केक खाल्ल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यही आजारी पडले होते.

मृत मुलीची आई काजल यांनी ऑर्डर केलेल्या केकच्या बिलच्या प्रतीनुसार, केक कान्हा या रेस्टॉरंटमधून मागवला होता. पटियाला येथे नोंदणीकृत पत्त्यावर ‘केक कान्हा’ नावाचे कोणतेही रेस्टॉरंट नाही. त्यामुळे ते बेकरी म्हणजे क्लाउड किचन असल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय, झोमॅटोकडून हा केक पटियाला नव्हे तर अमृतसर येथून मागवल्याचे दाखवत आहे.