Coronavirus: गेल्या 24 तासांत सीमा सुरक्षा दलातील 10 जवानांना कोरोना व्हायरसची बाधा
BSF Soldier | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Coronavirus: गेल्या 24 तासांत सीमा सुरक्षा दलातील (Border Security Force) 10 जवानांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. या जवानांवर कोरोना हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी दिल्लीतील 13 बीएसएफ जवानांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात आतापर्यंत 85 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अनेक जवान, डॉक्टर्स, नर्स, पोलीस आदीं कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत अनेक बीएसएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात दिल्लीमध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानांची संख्या जास्त आहे. (हेही वाचा - Lockdown 4.0: देशात उद्यापासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात; महाराष्ट्रात अनेक नियमांना शिथिलता दिली जाण्याची शक्यता)

दरम्यान, लॉकडाऊनमुळे पोलीस यंत्रणा तसेच जवानांवरील ताण वाढत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 1206 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासांत 66 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 283 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून 912 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.