भारतीय सैन्यातून 1 लाख सैनिक कमी केले जाणार; अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला दिली माहिती
Indian Army (Photo Credits- PTI)

भारतीय लष्कराचे (Indian Army) स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सैन्याच्या लाजिस्टक टेल कमी करण्याची तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत सैन्याच्या तुकडीसमवेत पुरवठा व पाठिंबा देण्यात गुंतलेल्या सैनिकांची संख्या कमी करण्यात येणार आहे. येत्या तीन-चार वर्षांत सुमारे एक लाख सैनिक कमी करण्याचे लक्ष्य सैन्याने ठेवले आहे. सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीला ही माहिती दिली आहे. यात असं म्हटलं आहे की, लढाऊ सैन्य (पायदळ) वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केले जाईल. कारण सीमांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविले जाईल आणि 'टूथ टू टेल रेशियो' कमी केला जाईल.

याचा अर्थ असा की पुरवठा आणि सहाय्य करण्याच्या कामात गुंतलेल्या सैनिकांची संख्या कमी होईल. वास्तविक, लढाऊ सैन्यासह पुरवठा व पाठबळ सैनिकांची एक ठराविक संख्या असते. हे सैनिक सर्व संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करतात. परंतु सैन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या पद्धतीने वाढत आहे, त्या प्रकारात आता या प्रकारची यंत्रणा अनावश्यक मानली जात आहे. (वाचा - CRPF Mumbai Headquarters: मुंबई सीआरपीएफ मुख्यालयात धमकीचा ईमेल, तीन राज्यांत 200 KG हाय ग्रेड RDX पोहोचवल्याचा दावा)

संसदीय समितीला एक उदाहरण देऊन समजावून सांगण्यात आलं की, सैन्याच्या लढाऊ कंपनीत सध्या 120 लोक आहेत. परंतु ही कंपनी तंत्रज्ञानाने सज्ज असेल तर तेच काम 80 लोक करू शकतात, ज्यामध्ये अद्याप 120 लोक काम करत आहेत.

दरम्यान, भारतीय सैन्याच्या वतीने असं म्हटले जात आहे की, जनरल व्ही.पी. मलिक लष्करप्रमुख असताना तेथे 50 हजार लोकांची कमी होती. पण आता पुढच्या तीन-चार वर्षांत एक लाख लोक कमी होऊ शकतात. यातून उरलेली रक्कम सैनिकांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात खर्च केली जाईल. समितीचा हा अहवाल नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात संसदेत मांडण्यात आला आहे.