ठळक बातम्या
Bangladesh ISKCON News: बांग्लादेशमध्ये इस्कॉनला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नका
Prashant Joshiबांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्यात येणार नाही. ढाका उच्च न्यायालयाने बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावत देशातील हिंदू अल्पसंख्याकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने अंतरिम सरकारला देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.
Cyber Fraud in India: भारतामध्ये 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीद्वारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान; तब्बल 45% तक्रारी दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित
Prashant Joshiसेंट्रल फायनान्शियल सायबर क्राईम रजिस्ट्रीकडील डेटा- सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) - 2024 मध्ये जवळपास 12 लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी 45 टक्के कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधील आहेत.
Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग (Watch Video)
Dipali Nevarekarसध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी दाखल झाले आहे.
Hemant Soren यांनी झारखंड च्या 14 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Dipali NevarekarJMM नेते Hemant Soren आज चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.
Indian Team meet Australian PM Anthony Albanese: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी टीम इंडियासोबत घेतली सेल्फी, कोहलीच्या शतकाबद्दल केले अभिनंदन
Nitin KurheIND vs AUS: टीम इंडियाला 30 नोव्हेंबर रोजी कॅनबेरा मैदानावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध 2 दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे, जो फक्त गुलाबी चेंडूने खेळला जाईल. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज यांनी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता.
Air India Pilot Srishti Tuli Death Case: एअर इंडिया पायलट सृष्टी तुली हिची आत्महत्या नव्हे हत्या झाली; कुटुंबीयांचा आरोप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएअर इंडिया पायलट सृष्टी तुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर छळ केल्याचा आरोप करत हत्येचा आरोप केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
IND vs AUS 2nd Test 2024: विराट कोहलीला ॲडलेडमध्ये ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी, कराव्या लागतील फक्त 43 धावा
Nitin Kurheपहिल्या कसोटीत चाहत्यांनी त्याचे वैशिष्ट्य पाहिले आहे. जिथे कोहली न्यूझीलंडविरुद्ध धावा काढण्यासाठी धडपडत होता. मात्र ऑस्ट्रेलियन संघ पुढे येताच तो तुटून पडला आणि दमदार शतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Central Government: केंद्र सरकारची वीज नेटवर्क वाढवण्यासाठी ९.१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना, जाणून घ्या अधिक माहिती
Shreya Varkeकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने देशातील वीज पारेषण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 2031-32 पर्यंत 9.12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री म्हणाले, "राष्ट्रीय ऊर्जा योजनेनुसार (पारेषण), 1.91 लाख किलोमीटर (किमी) पारेषण लाईन आणि 1274 गिगा व्होल्ट अँपिअर (जीव्हीए) ट्रान्सफॉर्मेशन क्षमता (220 केव्ही) 2022-23 ते 10 वर्षांच्या कालावधीत 2031-32 आणि वरील व्होल्टेज स्तरावर) जोडले जाईल.
Satta Matka: गली सट्टा ते फरीदाबाद सट्टा पहा सट्टा किंग गेम मध्ये कोणकोणते प्रकार असतात?
Dipali Nevarekarगली सट्टा, दिसावर सट्टा, फरिदाबाद सट्टा, गाजियाबाद सट्टा यांचा समावेश आहे. या खेळामध्ये प्रत्येकाचे नियम थोडे वेगळे आहेत. मात्र त्याचा उद्देश एकच आहे.
Mumbai Water Cut: मुंबई शहरात 22 तास पाणीकपात; विभाग, तारीख आणि कालावधी घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईकर नागरिकांनो नुकताच पावसाळा संपला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असला तरी, येत्या आज म्हणजेच गुरुवार (28 नोव्हेंबर) रात्री 10 वाजलेपासून आणि शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रात्री आठ वाजेपर्यत तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे.
Japanese Encephalitis in Delhi: दिल्ली शहरात जपानी एन्सेफलायटीस रुग्णाची नोंद; अधिकाऱ्यांकडून उद्रेक नसल्याची पुष्टी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपश्चिम दिल्ली येथील उत्तम नगर परिसरात एका 72 वर्षीय व्यक्तीची जपानी एन्सेफलायटीसची (JE) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, या रुग्णांची संख्या अधिक नाही आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा उद्रेक नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
12th Vasai-Virar Marathon: पश्चिम रेल्वे 8 डिसेंबर रोजी वसई-विरार मॅरेथॉनच्या सहभागींसाठी चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiपश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, ते चर्चगेट ते विरारपर्यंत रविवार, 8 डिसेंबर 2024 रोजी दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवणार आहेत. सहभागी मॅरेथॉनच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यासाठी पहाटेच्या वेळी या गाड्या धावतील.
Bride Viral Video: वधूच्या पाठवणीचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeचातुर्मास संपल्याने पुन्हा एकदा लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नाच्या मोसमात, देशाच्या कानाकोपऱ्यातून लग्न, मिरवणूक आणि निरोपाशी संबंधित अनेक मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. विवाह हा नि:संशय आनंदाचा क्षण असतो, पण वधूच्या निरोपाच्या वेळी कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू येणं स्वाभाविक आहे. दरम्यान, निरोपाचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल की, हा फेअरवेल अपहरण आहे.
दिल्ली मध्ये Prashant Vihar भागात स्फोट; अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल (Watch Video)
Dipali Nevarekarसध्या अग्निशमन दल, CRPF घटनास्थळी दाखल आहे. हा भाग सध्या सील करण्यात आला आहे.
Digital Arrest Scam: डिजिटल अटक घोटाळे रोखण्यासाठी सरकारने उचलली कडक पाऊलं, जाणून घ्या, अधिक माहिती
Shreya Varkeदेशात डिजिटल अटक घोटाळ्यांमध्ये वाढ होत असताना सरकारने घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, 6.69 लाखांहून अधिक सिमकार्ड आणि 1,32,000 IMEI क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. गृह बंदीचे राज्यमंत्री संजय कुमार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारने डिजिटल अटक आणि इतर सायबर गुन्ह्यांना अळा घालण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
दुचाकी चालक आणि चालकामागे बसणार्याला हेल्मेट न घालणं आता पडणार महागात; महाराष्ट्र पोलिसांकडून नियमाच्या कडकपणे अंमलबजावणीचे निर्देश, पुण्यातही विशेष मोहिम
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात आता पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट नसलेल्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करणारा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. अधिकारी तपास करत आहेत, संशयित व्यक्तीची ओळख मनोरुग्ण महिला अशी झाली आहे.
MHT CET 2025 Exams Dates: महाराष्ट्र सीईटी सेल कडून परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक cetcell.mahacet.org वर जारी
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देखील वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये यंदा बारावीच्या बोर्ड परीक्षा राज्यात 11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान होणार आहे.
Priyanka Gandhi Vadra takes Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan यांनी घेतली खासदारकीची शपथ; लोकसभेत घुमला मराठी आवाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार म्हणून शपथ घेतली, तर नांदेड पोटनिवडणुकीचे विजेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मातृभाषेत मराठीमध्ये शपथ घेतली.
Priyanka Gandhi Vadra to Take Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan घेणार खासदारकीची शपथ; जाणून घ्या ठळक मुद्दे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि रवींद्र वसंतराव चव्हाण आज (28 नोव्हेंबर) लोकसभेची शपथ घेणार आहेत. पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रवींद्र चव्हाण नांदेडची जागा भरतात, तर प्रियांका गांधी संसदेत गांधी कुटुंबातील तिसऱ्यांदा सदस्या बनत आहेत. या आधी दोन वेळा राहुल गांधी यांनी या ठिकाणी प्रतिनिधीत्व केले आहे.