Mumbai Water Cut: मुंबई शहरात 22 तास पाणीकपात; विभाग, तारीख आणि कालावधी घ्या जाणून
शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असला तरी, येत्या आज म्हणजेच गुरुवार (28 नोव्हेंबर) रात्री 10 वाजलेपासून आणि शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रात्री आठ वाजेपर्यत तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे.
मुंबईकर नागरिकांनो नुकताच पावसाळा संपला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असला तरी, येत्या आज म्हणजेच गुरुवार (28 नोव्हेंबर) रात्री 10 वाजलेपासून आणि शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रात्री आठ वाजेपर्यत तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे. या कालावधीत मुंबई शहरातील विविध भागात पाणीकपात (Mumbai Water Cut) होणार आहे. बीएमसीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जवळपास 22 तास इतक्या प्रदीर्घ काळासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सहाजिकच नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि ते काटकसरीने वापरण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असलेले भाग
मुंबई शहरातील पाणीपुरवठा बंद असलेले भाग, त्यांची वेळ आणि कालावधी खालील प्रमाणे:
जी दक्षिण विभाग
परिसर: करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग
जलनियोज स्थिती: पाणीपुरवठा पूर्णत: बंद
नियमित पाणीपुरवठ्याची वेळ: पहाटे 4.30 ते सकाळी 7.45
दरम्यान, याच विभागातील (जी दक्षिण) ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ या परिसरात दुपारी 2.30 ते दुपरी 3.30 वाजता पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने बंद राहणार आहे.
जी दक्षिण विभाग:
परिसर: संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक.
नियमित पाणीपुरवठ्याची वेळ: दुपारी 3.30 ते सायंकाळी 7.00
जलनियोज स्थिती: पाणीपुरवठा पूर्णत: बंद
जी उत्तर विभाग:
परिसर: सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग
नियमित पाणीपुरवठ्याची वेळ: दुपारी दुपारी 3.30 ते सायंकाळी 7.00
जलनियोज स्थिती: पाणीपुरवठा पूर्णत: बंद
दरम्यान, याच विभागातील (जी उत्तर) सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग परिसरात पाणीपुरवठा केवळ अंशत: म्हणजेच 33% बंद राहणार आहे. या ठिकाणी नियमीत पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 7.00 ते रात्री 10.00 राहील. जलवाहीनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काठकसरीने वापरावे, तसेच आवश्यक प्रमाणात ते साठवूनही ठेवावे, असे असे अवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे.