ठळक बातम्या
Women's Premier League 2025 Auction: आयपीएलनंतर आता वुमन्स प्रीमियर लीगचा होणार लिलाव, कधी आणि कुठे होणार घ्या जाणून
Nitin KurheWomen's Premier League 2025: नुकताच आयपीएल 2025 चा मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र महिला प्रीमियर लीगचा लिलाव फक्त भारतातच होणार आहे. सर्व डब्ल्यूपीएल संघांनी खेळाडूंची कायम ठेवलेली यादी आधीच जाहीर केली होती.
Fallon Guliwala Detained By Customs Department: 'बिग बॉस' Ajaz Khan ची पत्नी फॅलन गुलीवालाला ड्रग्ज प्रकरणात अटक; छाप्यावेळी घरात सापडले अंमली पदार्थ, अभिनेत्याचा शोध सुरू
Prashant Joshiसीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार आणि गुरुवारी एजाज खानच्या जोगेश्वरी येथील घरावर छापा टाकला. हे घर फॉलन एजाज गुलीवाला हिच्या नावावर आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फॅलन गुलीवालाच्या फ्लॅटची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे काही ड्रग्ज आणि 11 लाख रुपये रोख सापडले.
BJP Legislature Party Meeting: रविवारी होऊ शकते भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक; 'या' दिवशी शपथविधी होण्याची शक्यता
Bhakti Aghavमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपचाचं चेहरा असणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास काय होणार? यावर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
New Zealand vs England 1st Test 2024 Day 2 Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावा; हॅरी ब्रूकने झळकावले शानदार शतक
Nitin Kurheदुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या न्यूझीलंडपेक्षा 29 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावा आणि बेन स्टोक्स 76 चेंडूत 37 धावा करून नाबाद आहे.
Gondia Shivshahi Bus Accident: शिवशाही बसला अपघात, 8 जण ठार; गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी खजरी येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवाशाही बस (Shivshahi Bus Accident) उलटल्याने 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील खजरी (Arjuni Khajari) गावाजवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडला.
Dating Scam in Thane: मानपाड्यात बंबल डेटला क्लबमध्ये नेले, 39 हजारांची केली फसवणूक, बिल भरण्यास सांगताच महिलेने काढला पळ
Shreya Varkeठाणे, मुंबई येथे ऑनलाइन डेटिंगचा घोटाळा उघडकीस आला असून, शहरातील एका २५ वर्षीय तरुणाची ३९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्या व्यक्तीने दावा केला होता की, तो एका महिलेला ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर भेटला होता आणि तिला ठाण्यातील एका क्लबमध्ये भेटला होता. ग्लिट द सपर क्लबमध्ये त्यांच्या भेटीदरम्यान, महिलेने अन्न आणि पेय ऑर्डर केले.
Maharashtra Govt Formation: महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला 22, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे; मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स- Report
Prashant Joshiअहवालानुसार मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांचा समावेश असेल, ज्यात भाजपचे 22, शिवसेनेचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे 10 मंत्री असतील. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, भाजप मुख्य पोर्टफोलिओवर वाटाघाटी करत आहे, ज्यात गृहखातेदेखील आहे.
Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने घेतला आश्चर्यकारक झेल! क्षेत्ररक्षक, प्रेक्षक सगळेच अचंबित (पाहा व्हिडिओ)
Nitin Kurheइंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान ओली पोप 77 धावांवर फलंदाजी करत असताना त्याने फिलिप्सजवळ टिम साउथीच्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला. ग्लेन फिलिप्सने उडी मारून तो पकडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' महिन्यात मिळणार पुढचा हप्ता
Bhakti Aghavसरकार पात्र भगिनींच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 चे लाभ आधीच जमा केले आहेत. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाभ देण्यात आले आहेत.
Viral Video: महाकाय लेदरबॅक कासव पाहून व्हाल चकित, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeतुम्ही समुद्र, नदी किंवा तलावात अशी कासवे पाहिली असतील, ज्यांचे कवच साधारणपणे कठीण असते. या प्रकारचे कासव सामान्य आहेत आणि ते सर्वत्र पाहिले जाऊ शकतात, परंतु तुम्ही कधी लेदरबॅक समुद्री कासव पाहिले आहे का? वास्तविक, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विशाल समुद्री कासव पुन्हा समुद्रात जाताना दिसत आहे. कासवाला हळू हळू समुद्राकडे जाताना पाहून लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना, त्यामुळे तिथे उपस्थित असलेले लोक कासवाकडे बघताना दिसले.
THAR वर माती टाकून उलट दिशेने प्रवास; स्टंटबाज तरुणाचे उपदव्याप; Video व्हयरल होताच Meerut पोलीसांकडून तपास सुरु
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएक पठ्ठ्याने चक्क महागड्या थार (THAR) गाडीच्या छतावर चक्क शेतातील माती टाकली. तो इतकेच करुन थांबला नाही, तर त्याने चक्क रस्त्याच्या उलट दिशेने प्रवास केला. उलट्या रस्त्याने जाणारा तरुण आणि थारच्या छतावरुन उडणारी धूळ, असा काहीसा विचीत्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Blue Parrot Viral Video: निळ्या पोपटावर प्रेमाचा वर्षाव पक्ष्याचे सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeपृथ्वीतलावर अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यापैकी पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आपल्याला दररोज पाहायला मिळतात, तर काही प्रजाती थोड्या दुर्मिळ मानल्या जातात आणि त्यांना पाहून लोकांना फार आनंद होतो. विशेषतः जर आपण पोपटांबद्दल बोललो तर ते सहसा हिरव्या रंगाचे असतात, परंतु ते इतर अनेक प्रजातीचे आढळतात आणि दिसायला खूपच सुंदर असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला एका निळ्या पोपटाचे चुंबन घेत आहे सोशल मिडीयावर या पक्ष्याचे सौंदर्य पाहून लोक प्रभावित होत आहेत.
Naga Chaitanya And Sobhita Dhulipala's Wedding: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाहपूर्व उत्सव मंगलस्नान आणि हळदी समारंभाने सुरू, See Pics
Bhakti Aghavहळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची सुरुवात हळदीपासून झाली, ज्यामध्ये त्यांच्या जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता यांचा विवाह 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होणार आहे.
Dua Lipa Concert in Mumbai: दुआ लीपा हिची BKC येथे मैफील; मुंबई पोलिसांकडून वाहतूक निर्बंध जारी, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Traffic Advisory: मुंबई येथील बीकेसी परिसरात दुआ लीपा हिची मैफील येत्या 30 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. पर्यायी मार्ग आणि कार्यक्रमाच्या तपशीलांसाठी खालील माहिती घ्या जाणून. बीकेसीमधील दुआ लीपा हिच्या कार्यक्रमापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी
Jailer 2 Sequel: रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त 'जेलर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा; अभिनेता एकटाचं साकारणार 6 पात्र
Bhakti Aghavजेलर-2 ची घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी निर्माते या चित्रपटाची संपूर्ण माहिती उघड करणार आहेत.
Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रौढ सामग्री उत्पादन आणि बिटकॉइन फसवणूकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्राच्या परिसरात छापे टाकले.
MSRTC Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! विलंब झालेला 6 हजार रुपये दिवाळी बोनस आज खात्यात जमा होणार
Bhakti Aghavआदर्श आचारसंहिता आणि राज्य सरकारकडून निधी वाटपात होणारा विलंब यामुळे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिवाळीनंतरच मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दिवाळी भेटीचा खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागत असल्याने राज्य सरकारने आर्थिक मदत करणे अपेक्षित होते.
Cyclone Fengal Updates: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; पुदुच्चेरी किनारपट्टीजवळ चक्रीवादळ फेंगल कमकुवत होण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेफेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरातील खोल कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू आणि पुदुच्चेरीजवळ येत असल्याने ते कमकुवत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रातील खडतर परिस्थिती निर्माण होईल.
Fake Bomb Threats In Two Years: देशात 2 वर्षात 1100 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या; सरकारने संसदेत उघड केली धक्कादायक आकडेवारी
Bhakti Aghavसरकारने संसदेत उघड केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. गेल्या दोन वर्षांत 1100 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे. गुरुवारी लोकसभेत माहिती देताना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्र्याने सांगितले की, ऑगस्ट 2022 ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 1148 बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.
Kota Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षांची शिक्षा
Shreya Varkeराजस्थानमधील कोटा येथील पॉक्सो न्यायालयाने गुरुवारी एका 22 वर्षीय तरुणाला तीन वर्षांपूर्वी आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. न्यायालयाने दोषीला 1.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.