BJP Legislature Party Meeting: रविवारी होऊ शकते भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक; 'या' दिवशी शपथविधी होण्याची शक्यता
भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास काय होणार? यावर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
BJP Legislature Party Meeting: महाराष्ट्रात महायुती सरकारचा (Mahayuti Government) फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक (BJP Legislature Party Meeting) 1 डिसेंबरला होऊ शकते. या बैठकीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची (Leader of The BJP Legislature Party) निवड होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
2 किंवा 3 डिसेंबर होऊ शकतो महायुती सरकारचा शपथविधी -
तथापी, 2 किंवा 3 डिसेंबर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो. यामध्ये भाजपचे बडे नेते आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश असू शकतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Maharashtra Govt Formation: महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला 22, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे; मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स- Report)
प्राप्त माहितीनुसार, महाआघाडी सरकारमध्ये भाजपचे 17 कॅबिनेट मंत्री असू शकतात. भाजप 50 टक्के नवीन आणि 50 टक्के जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देऊ शकते. एकनाथ शिंदे गटाचे 9 कॅबिनेट मंत्री असू शकतात. अजित पवार गटातील नेत्याला 7 कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकता, अशी चर्चा आहे. (हेही वाचा -Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पाठींबा! भाजपचाचं होणार पुढचा मुख्यमंत्री; जाणून घ्या अमित शहांसोबतच्या बैठकीत आतापर्यंत काय घडले)
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद नाकारल्यास काय होणार?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपचाचं चेहरा असणार असल्याचं निश्चित झालं आहे. भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास काय होणार? यावर आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भात बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांनी काही कारणास्तव उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही, तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याला दिले जाईल. एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये नक्कीच जाणार नाहीत.
पुढील मुख्यमंत्रिपदाच्या नावाच्या भाजप नेतृत्वाच्या निर्णयाला आपण पूर्ण पाठिंबा देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जाऊ शकते की नाही? तसेच अशी ऑफर त्यांना देण्यात आली तर ते ही ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.