Dua Lipa Concert in Mumbai: दुआ लीपा हिची BKC येथे मैफील; मुंबई पोलिसांकडून वाहतूक निर्बंध जारी, घ्या जाणून
Mumbai Traffic Advisory: मुंबई येथील बीकेसी परिसरात दुआ लीपा हिची मैफील येत्या 30 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. पर्यायी मार्ग आणि कार्यक्रमाच्या तपशीलांसाठी खालील माहिती घ्या जाणून. बीकेसीमधील दुआ लीपा हिच्या कार्यक्रमापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी
Dua Lipa Mumbai Concert: ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका दुआ लीपा 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानावर झोमॅटो फीडिंग इंडिया उपक्रमाचा (Zomato Feeding India Event) भाग म्हणून सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमाला अपेक्षित असलेल्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रस्ते बंद आणि वाहतूक निर्बंध (BKC Traffic Restrictions) जारी केले आहेत. हे सर्व निर्बंध 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजलेपासून, वाहतुकीचे नियम लागू केले जातील, ज्यामुळे बीकेसी क्षेत्राच्या आसपासच्या प्रमुख मार्गांवर परिणाम होईल. प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.
बिकेसी येथील वाहतूक मार्गांतील बदल खालील प्रमाणे:
- प्रतिबंधित मार्गः दुआ लीपा हिच्या कर्यक्रमादरम्यान वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) धारावी आणि वांद्रे वरळी सी लिंक (BWSL) भारत नगर जंक्शन मार्गे कुर्ला येथे वाहन प्रवेश नाही.
- संत ज्ञानेश्वर नगर ते कुर्लाः भरत नगर जंक्शनजवळ मर्यादित.
- खेरवाडी शासकीय वसाहत, कनकिया पॅलेस आणि यु. टी. आय. टॉवरः बी. के. सी., चुनाभट्टी आणि कुर्ला येथे प्रवेश नाही.
- कुर्ला आणि रज्जाक जंक्शन ते डब्ल्यू. ई. एच., धारावी आणि बी. डब्ल्यू. एस. एल.: वाहतूक प्लाटिना जंक्शनमार्गे भारत नगर जंक्शनकडे वळवण्यात आली.
- सीएसटी रोड ते एमएमआरडीए मैदान आणि जेएसडब्ल्यू इमारतः वाहनचालकांना यूटीआय टॉवर आणि कनकिया पॅलेसकडे पुनर्निर्देशित केले जाईल.
- अंबानी स्क्वेअर ते डायमंड जंक्शन आणि लक्ष्मी टॉवर ते नाबार्ड जंक्शनः कार्यक्रमाच्या कालावधीसाठी मार्ग बंद राहतील. (हेही वाचा, हॉलीवूडची लोकप्रिय गायिका Katy Perry चे मुंबईमध्ये दमदार आगमन; OnePlus Music Festival मध्ये करणार परफॉर्म (Video))
मुंबई पोलिसांकडून प्रवाशांसाठी सूचना
वाहनचालकांना ही बिकेसीतील प्रतिबंधीत क्षेत्रे टाळण्यास आणि विलंब कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे अवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. वाहनांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि मैफिलीच्या ठिकाणाभोवती वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुआ लीपा हिची एक झलक
दुआ लिपाचे मुंबईत आगमन
आंतरराष्ट्रीय पॉप सेंसेशन 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झाली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. ती तिच्या वाहनाच्या दिशेने जात असताना पापाराझीने तिला पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि सैल पँट घालून विमानतळावर आपल्या कॅमेऱ्यांनी टीपले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)