Fake Bomb Threats In Two Years: देशात 2 वर्षात 1100 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या; सरकारने संसदेत उघड केली धक्कादायक आकडेवारी
सरकारने संसदेत उघड केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. गेल्या दोन वर्षांत 1100 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे. गुरुवारी लोकसभेत माहिती देताना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्र्याने सांगितले की, ऑगस्ट 2022 ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 1148 बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.
Fake Bomb Threats In Two Years: देशात बनावट बॉम्बच्या धमकीची (Fake Bomb Threats) प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सरकारने संसदेत उघड केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. गेल्या दोन वर्षांत 1100 हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे. गुरुवारी लोकसभेत माहिती देताना भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्र्याने सांगितले की, ऑगस्ट 2022 ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 1148 बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. कॉल आणि मेसेजद्वारे या धमक्या देण्यात आल्या आहेत.
11 महिन्यांत 999 बॉम्बच्या धमक्या -
2024 मध्ये 11 महिन्यांत 999 बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांमुळे उड्डाण करण्यात अडचण येत आहे आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यातही अडचण येत आहे. बॉम्बची धमकी मिल्यानंतर संपूर्ण तपास केला जातो, त्यामुळे उड्डाणाला विलंब होतो. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)
बनावट बॉम्बच्या धमक्यांवर सरकारची कारवाई -
बॉम्बच्या या बनावट धमक्यांबाबत काय कारवाई केली? याचं उत्तर देखील सरकारने सांगितले आहे. जानेवारी 2024 पासून अशा प्रकरणांमध्ये 256 एफआयआर आणि 12 अटक करण्यात आली आहेत. 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 163 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. (हेहीव वाचा - Lucknow Hotels Receive Bomb Threats: 'तळमजल्यावर काळ्या पिशव्यांमध्ये बॉम्ब आहेत...'; लखनौच्या मॅरियट, फॉर्च्युन, लेमन ट्रीसह 10 हॉटेल्सला बॉम्बने उडवण्याची धमकी)
या प्रकरणाशी संबंधित कायदे बदलायला हवेत, असे सरकारचे मत आहे. अशा परिस्थितीत सरकार सरकारी विमान (सुरक्षा) नियम, 2023 मध्ये बदल करू शकते, असे मानले जाते. बॉम्बच्या बनावट धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय सरकार सुरक्षेशी संबंधित उपायांचा सतत आढावा घेत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)