THAR वर माती टाकून उलट दिशेने प्रवास; स्टंटबाज तरुणाचे उपदव्याप; Video व्हयरल होताच Meerut पोलीसांकडून तपास सुरु

एक पठ्ठ्याने चक्क महागड्या थार (THAR) गाडीच्या छतावर चक्क शेतातील माती टाकली. तो इतकेच करुन थांबला नाही, तर त्याने चक्क रस्त्याच्या उलट दिशेने प्रवास केला. उलट्या रस्त्याने जाणारा तरुण आणि थारच्या छतावरुन उडणारी धूळ, असा काहीसा विचीत्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Meerut Thar Stunt Video | (Photo Credit - X)

Meerut Thar Stunt Video: देशात उपदव्याप करणाऱ्या तरुणांची कमी नाही. हे तरुण स्टंट करण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे अनेक उदाहरणांतूनही पुढे आले आहे. अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडिओ पुढे आला आहे. या पठ्ठ्याने चक्क महागड्या थार (THAR) गाडीच्या छतावर चक्क शेतातील माती टाकली. तो इतकेच करुन थांबला नाही, तर त्याने चक्क रस्त्याच्या उलट दिशेने प्रवास केला. उलट्या रस्त्याने जाणारा तरुण आणि थारच्या छतावरुन उडणारी धूळ, असा काहीसा विचीत्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील आहे.

मेरठ पोलीस तपासावर

सोशल मीडियावर व्हायरल झालेली THAR आणि तो चालवणारा युवक. दोन्ही सध्या चर्चेत आहेत. थारच्य नंबरप्लेटवर असलेल्या क्रमांकावरुन हे वाहन उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे. पण, हा युवक आणि तो चालवत असलेल्या वाहनाची मालकी याबाबत अद्याप कोणताही तपशील पुढे आला नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळताच वाहनावरील क्रमांक पाहून मेरठ पोलीस सध्या सक्रीय झाले आहेत. ते वाहन आणि वाहनमालकाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करत असल्याचे समजते. मात्र, गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताबाबत पुष्टी होऊ शकली नाही. (हेही वाचा, Viral video: इंदापूरच्या शेतकर्‍याचा गजब थाट; 'थार' ला नांगर जोडून नांगरणी (Watch video))

तरुणाईत थारची क्रेझ

व्हिडिओत पाहायला मिळते की, रस्त्यावरु उलट्या दिशेने तेही भरधाव वेगाने जाणारी कार छतावरील मातीमुळे धुरळा उडवत आहे. महिंद्रा थारची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. ही क्रेझ अद्यापही कायम आहे. त्यामुळे अनेक तरुणांकडून स्टंटबाजी करताना अशा प्रकारे महागड्या वाहनांचा चुकीचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, Anand Mahindra यांनी दिलेला शब्द केला पूर्ण, Sarfaraz चे वडील Naushad Khan यांना गिफ्ट केली 'थार' (Watch Video))

थारवरील धूळ लोकांच्या डोळ्यात

दरम्यान, व्हिडिओत असेही पाहायला मिळत आहे की, युवक सर्वप्रथम शेतात एक खट्टा खणतो आहे. त्या खड्ड्यातून निघालेली माती तो तार कारच्या छतावर टाकतो आहे. जळपास चार फूट खोल खोदलेल्या खड्ड्यातील माती तो छतावर टाकतो आहे. तो इतकेच करुन थांबत नाही तर त्याने ती थार रहदारीच्या रस्त्यावरुन भरधाव वेगाने चालवली. ज्यामुळे छतावरची माती उडाली आणि ती धूळ होऊन अनेकांच्या डोळ्यांमध्ये गेली. रस्त्यावरुन वाहन हाकणाऱ्या इतर वाहनचालकांच्या डोळ्यात गेलेल्या धुळीमुळे अपघात घडण्याची चिन्हे होती. मात्र, तसे काही घडले नाही.

धूळ उडवीत 'ठकूर' निघाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, प्रकरणाची दखल घेतली आहे. तरुण आणि त्याची थार कार यांचा शोध घेतला जात आहे. कारच्या पाठीमागच्या बाजूला 'ठाकुर' असे लिहिले असून, नंबरप्लेटवर UP15 सीरिज पाहायला मिळते. जी मेरठ येथील आहे. आरटीओद्वारा माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच तरुणास अटक केली जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now