Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रौढ सामग्री उत्पादन आणि बिटकॉइन फसवणूकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्राच्या परिसरात छापे टाकले.

Raj Kundra, Shilpa Shetty (PC - PTI, Instagram)

Hotshots App Controversy: मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे ॲडल्ट कंटेंट (Adult Content Case) निर्मिती आणि वितरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी उद्योगपती राज कुंद्रा ( Raj Kundra ED Raids) आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty News) यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींशी संबंधित इतर मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. कुंद्रा यांस मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले होते. अलिकडेच ते अजय भारद्वाजशी संबंधित बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित एका वेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी यंत्रणांच्या रडारवर आहेत.

शिल्पा शेट्टीची मालमत्ता ईडीकडून जप्त

शिल्पा शेट्टी यांच्या मालकीचा जुहू येथील फ्लॅट ईडीने तपासाचा एक भाग म्हणून जप्त केला आहे. या फ्लॅटची मालकी शेट्टी यांना हस्तांतरीत करण्यापर्वी मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांचा पती राज कुंद्रा यांनी बेकायदेशीर निधीचा वापर केला, असा चौकशी यंत्रणेचा आरोप आहे. (हेही वाचा, Shilpa Shetty आणि Raj Kundra यांना उच्च न्यायालयाकडून ED च्या बेदखल नोटीसविरोधात दिलासा, काय आहे नेमके प्रकरण? वाचा)

राज कुंद्रा यांच्यावर असलेले आरोप

सध्यास्थितीत बंद असलेल्या हॉटशॉट्स मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे अश्लिल आशय तयार करण्यात आणि प्रसारित करण्यात कुंद्राचा सहभाग असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्यावरील प्रमुख आरोप पुढीलप्रमाणे:

कायदेशीर कारवाई

राज कुंद्रा यांना मोबाईल प्लॅटफॉर्मद्वारे प्रौढ सामग्री नेटवर्क चालवल्याबद्दल सर्वप्रथम 2021 मध्ये कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. या वादानंतर गुगल आणि ऍपल या दोघांनीही त्यांच्या प्लेस्टोरअरमधून हॉटशॉट्स ॲप काढून टाकले.

ईडी अजय भारद्वाज यांचा समावेश असलेल्या बिटकॉइन फसवणुकीच्या प्रकरणाशी कुंद्राच्या संभाव्य संबंधांची चौकशी स्वतंत्रपणे करत आहे. दुसऱ्या बाजूला ईडी कुंद्राच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असून, येत्या काही दिवसांत पुढील कारवाई अपेक्षित आहे. महत्त्वाचे असे की, अधिकाऱ्यांनी ताज्या छाप्यांचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.