Raj Kundra Debunks Separation Rumours: राज कुंद्रा UT 69 या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तुरुंगात असताना त्याला सामोरे जावे लागलेल्या आव्हानात्मक काळाची आणि त्यानंतरच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली आहे. आज राज कुंद्रा यांनी आम्ही वेगळे झालो आहोत, अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यामुळे राज कुंद्रा शिल्पा शेट्टीपासून विभक्त झाल्याच्या अफवा पसरल्या. यूटी 69 अभिनेत्याने आता एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे आणि शिल्पासोबतच्या त्याच्या विभक्त होण्याबद्दलच्या अफवांचे खंडन केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं आहे की, तो त्याच्या 'मास्क'सह वेगळे होत आहे. त्याने आपल्या पोस्टचा उल्लेख केला, “आता वेगळे होण्याची वेळ आली आहे! गेल्या दोन वर्षांपासून मला संरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. ” (हेही वाचा - Raj Kundra Post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने घेतला घटस्फोट? पोस्ट करत दिली माहिती)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)