ठळक बातम्या

Boat Capsize in Nigeria: नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; 27 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता

Jyoti Kadam

आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोट उलटल्याच्या घणांमध्ये वाढ झालीय. ताज्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. 100 जण बेपत्ता आहेत.

Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबईमधील 527 संरचना जीर्ण म्हणून घोषित; 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक

Prashant Joshi

याबाबत 31 मार्च 2025 पूर्वी संबंधित प्रभाग कार्यालय किंवा नगररचना विभागाकडे लेखापरीक्षण आणि अहवाल सादर करायचा आहे. नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.

India vs Prime Minister XI Live Streaming: ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हन आणि भारतीय संघ यांच्यात होणार चुरशीची लढत, तुम्ही येथे पाहू शकता विनामूल्य मॅच

Nitin Kurhe

30 नोव्हेंबरपासून ॲडलेडमध्ये कांगारूंशी सामना करण्यापूर्वी हा संघ पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूची कसोटी खेळेल. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघातील अनेक स्टार खेळाडू खेळण्याची अपेक्षा आहे.

SA vs SL 1st Test 2024 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून केल्या 103 धावा, दक्षिण आफ्रिका विजयापासून 5 विकेट दूर

Nitin Kurhe

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात 103 धावांत 5 गडी गमावले होते आणि आता त्यांना विजयासाठी 413 धावांची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशीचा खेळ निर्णायक असेल. शेवटचे दोन दिवस श्रीलंकेसाठी खूप आव्हानात्मक ठरतील.

Advertisement

Mohammed Shami Injury: टीम इंडियासाठी चिंतेची बाब, मोहम्मद शमी पुन्हा झाला जखमी

Nitin Kurhe

शमीच्या दुखापतीची बातमी काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेदरम्यान समोर आली होती. अशा परिस्थितीत शमीला दुखापत होणे ही खरोखरच टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यावेळी शमीला पाठीचा त्रास आहे.

Thane: भिवंडीत इमारतीच्या टेरेसवर हस्तमैथुन करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक; गुन्हा दाखल

Prashant Joshi

इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीचे हे कृत्य कैद झाले आहे. आरोपीचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या महिलांना विनयभंग झाल्याचे वाटले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Ishan Kishan Syed Mushtaq Ali: 09 षटकार, 05 चौकार... इशान किशनने केला कहर, संघ 4.3 षटकात विजयी

Nitin Kurhe

शुक्रवारी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 23 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत नऊ षटकार आणि पाच चौकार मारले, या खेळीमुळे झारखंड संघाने 4.3 षटकात लक्ष्य गाठले. इशान किशनने अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Waqf Board: वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला; BJP ने केला होता विरोध

Prashant Joshi

काही त्रुटींमुळे असा आदेश काढण्यात आल्याचे बोलले जात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने 28 नोव्हेंबर रोजी आपला आदेश जारी केला होता. जूनमध्ये निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले असून उर्वरित रक्कम नंतर देण्यात येईल, असे जाहीर केले होते.

Advertisement

11 Bowlers Used in a T20 Match: दिल्ली संघाने टी-20 मध्ये इतिहास रचला, पहिल्यांदाच एका सामन्यात सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी

Nitin Kurhe

शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 च्या गट सी सामन्यात मणिपूर विरुद्ध खेळताना, आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने नियुक्त केलेल्या यष्टीरक्षकासह सर्व 11 खेळाडूंना किमान एक षटक दिले. यष्टिरक्षक आणि कर्णधार आयुष बडोनीने दोन षटके टाकली आणि एक विकेटही घेतली.

Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख

Prashant Joshi

पंतप्रधान यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Employment Through Gig Economy: भारताची गिग अर्थव्यवस्था निर्माण करू शकेल 9 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी; GDP मध्ये 1.25 टक्क्यांची भर- Report

Prashant Joshi

'फोरम फॉर प्रोग्रेसिव्ह गिग वर्कर्स' च्या अहवालात म्हटले आहे की, ई-कॉमर्स, वाहतूक, वितरण सेवा आणि इतरांना समर्थन देणारी गिग अर्थव्यवस्था येत्या काही वर्षांत 17 टक्क्यांच्या विकास दराने (CAGR) वाढून $455 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

WI vs BAN 2nd Test 2024 Live Streaming: बांगलादेशला पराभूत करून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने वेस्ट इंडिज उतरणार मैदानात, येथे जाणून घ्या थेट सामन्याचा कधी, कुठे घेणार कसा आनंद

Nitin Kurhe

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 201 धावांनी पराभव केला. यासह यजमान वेस्ट इंडिजने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने वेस्ट इंडिजचा संघ उतरणार आहे.

Advertisement

Team India New ODI Jersey: बीसीसीआयने केले टीम इंडियाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण, जाणून घ्या त्याची सर्वात मोठी वैशिष्ट्ये

Nitin Kurhe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या उपस्थितीत नवीन जर्सीचे लाँच करण्यात आले. टीम इंडियाच्या नवीन वनडे जर्सीमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतील.

Resolution Against Use Of Vulgar Language: राज्यातील 'या' गावात महिलांच्या सन्मानार्थ असभ्य भाषेच्या वापराविरोधात ठराव मंजूर; षिविगाल केल्यास आकाराला जाणार 500 रुपये दंड

Prashant Joshi

आपल्या मुद्द्यावर जोर देताना अरगडे म्हणाले की, अशी भाषा वापरणारे हे विसरतात की आपण माता-भगिनींच्या नावाने जे बोलतो ते आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांनाही लागू होते. आम्ही अपमानास्पद भाषेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.

New Zealand vs England 1st Test 2024 Day 3 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळाला कधी होणार सुरुवात? कुठे पाहणार लाइव्ह? जाणून घ्या एका क्लिकवर

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 74 षटकांत 5 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या न्यूझीलंडपेक्षा 29 धावांनी मागे आहे. सध्या इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक 163 चेंडूत नाबाद 132 धावा आणि बेन स्टोक्स 76 चेंडूत 37 धावा करून नाबाद आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आयसीसीची बैठक संपली, मोठे अपडेट आले समोर

Nitin Kurhe

ICC Champions Trophy 2025: आयसीसीने या मेगा स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानला दिली होती. पण भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार देत स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवावी अस सांगितले. पण पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलला पुर्णपणे नकार दिला आहे.

Advertisement

IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, स्टार खेळाडू मैदानात परतण्यासाठी सज्ज!

Nitin Kurhe

IND vs AUS: विशेष म्हणजे शुभमनला पाहिल्यानंतर तो अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्याचं दिसत होतं. दुखापतीमुळे गिल पर्थ कसोटीत संघात नव्हता. जर हा उजव्या हाताचा फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त होऊन ॲडलेडमध्ये मैदानात उतरला तर टीम इंडियासाठी ती मोठी बूस्टर असेल.

Mahaparinirvan Din 2024 Special Trains: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 12 अनारक्षित विशेष फेर्‍या; पहा तपशील

Prashant Joshi

'महापरिनिर्वाण दिन' दरवर्षी 6 डिसेंबर रोजी असतो. थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो.

Baba Siddique Muder Case: 'पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज आहे'; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी लॉरेन्स बिश्नोईने थेट आरोपीशी साधला होता संवाद

Bhakti Aghav

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या तुरुंगात बंद आहेत. मुख्य शूटर शिवकुमार गौतम (Main Shooter Shivkumar Gautam) ने खुनाची योजना आखताना लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

Pregnant Woman Granted Bail: 'बाळावर परिणाम नको', गर्भवती महिलेस सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने NDPS कायद्यांतर्गत अटक केलेल्या गर्भवती महिलेला मानवतावादी कारणांचा हवाला देत सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. ज्यामुळे या महिलेला आपल्या बाळास तुरुंगाबाहेर जन्म देता येईल.

Advertisement
Advertisement