Resolution Against Use Of Vulgar Language: राज्यातील 'या' गावात महिलांच्या सन्मानार्थ असभ्य भाषेच्या वापराविरोधात ठराव मंजूर; षिविगाल केल्यास आकाराला जाणार 500 रुपये दंड
आम्ही अपमानास्पद भाषेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.
Resolution Against Use Of Vulgar Language: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात संभाषणादरम्यान शिवीगाळ करणे, किंवा गर्शब्द वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण येथील ग्रामस्थांनी शिवी किंवा अपशब्द वापरणे बंद करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रातील सौंदाळा गावातील (Saundala Village) लोकांनी शिवी देणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरपंच शरद अरगडे म्हणाले की, आमचे गाव सौंदाळा हे अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात येते. गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी मिळून शिवी देण्याबाबत निर्णय घेतला. महिलांचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले. अशा निर्णयानंतर कोणीही अशी भाषा वापरणार नाही, अशी आशा आहे.
आपल्या मुद्द्यावर जोर देताना अरगडे म्हणाले की, अशी भाषा वापरणारे हे विसरतात की आपण माता-भगिनींच्या नावाने जे बोलतो ते आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांनाही लागू होते. आम्ही अपमानास्पद भाषेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अपशब्द वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.
महिलांच्या सन्मानाबाबत बोलताना अरगडे म्हणाले की, आमच्या गावात यापूर्वीही महिलांचा स्वाभिमान लक्षात घेऊन सामाजिक रूढीवादी वाईट गोष्टींविरोधात निर्णय घेण्यात आले आहेत. ते म्हणाले की, आम्ही विधवांचा सामाजिक, धार्मिक विधी आणि रूढींमध्ये समावेश करतो. याशिवाय आमच्या गावात पतीच्या मृत्यूनंतर महिलांचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडण्यास मनाई आहे. अरगडे यांनी सांगितले की, या सर्व निर्णयांचा गावकरी आदर करतात आणि स्वीकार करतात. 2007 मध्ये आमच्या गावाला तंटामुक्त गाव म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला होता. (हेही वाचा: Burglary at Mobile Shop in Panvel: पनवेल मध्ये शिक्षणाच्या खर्चासाठी 20 वर्षीय तरूणाने चोरले 24 लाख किंमतीचे मोबाईल फोन्स; घटना सीसीटीव्हीत कैद)
गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. तसेच आता हे गाव बालकामगारमुक्तही होणार आहे. सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. 2011 च्या जनगणनेनुसार, सौंदळाची लोकसंख्या 1800 आहे. या गावात नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित शनि शिंगणापूर मंदिर आहे.