Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत आयसीसीची बैठक संपली, मोठे अपडेट आले समोर
पण भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार देत स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवावी अस सांगितले. पण पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलला पुर्णपणे नकार दिला आहे.
ICC Meeting On Champion Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मुद्दा अजूनही अडकला आहे. आयसीसीने या मेगा स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानला दिली होती. पण भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार देत स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवावी अस सांगितले. पण पाकिस्तानला हायब्रीड मॉडेलला पुर्णपणे नकार दिला आहे. या मुद्द्यावर आयसीसीने 29 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. आयसीसी सदस्यांची बैठक सुमारे 20 मिनिटे चालली. या बैठकीत सदस्य कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे क्रिकबझच्या सूत्राने सांगितले. मात्र, काही वेळानंतर पुन्हा बैठक होणार आहे. क्रिकबझच्या मते, हायब्रीड मॉडेलवर टूर्नामेंट आयोजित न करण्यावर पाकिस्तान ठाम राहिला. त्यांना कोणत्याही किंमतीत स्पर्धेचे आयोजन आपल्या ताब्यात ठेवायचे आहे.
हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान सहमत नसेल तर काय होईल?
जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली नाही, तर आयसीसीकडे फक्त काही पर्याय शिल्लक राहतील. ही स्पर्धा टीम इंडियाशिवाय खेळवली जाणार आहे. पण असे होणे जवळपास अशक्य आहे. जर भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर आयसीसीचे मोठे आर्थिक नुकसान होईल. याशिवाय दुसरा पर्याय म्हणजे स्पर्धा बाहेर हलवणे किंवा पाकिस्तानशिवाय स्पर्धा खेळवणे.
हे देखील वाचा: पाकिस्तानी संघाच्या हॉटेलमध्ये भीषण आग, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पीसीबीवर पुन्हा प्रश्नचिन्ह
8 संघ होणार सहभागी
7 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी 2017 मध्ये मेगा इव्हेंट खेळला गेला होता. त्यानंतर या मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी इंग्लंडने घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल झाली असली तरी. पाकिस्तानने भारताला हरवून जेतेपदावर कब्जा केला होता. यावेळी एकूण 8 संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असून त्यात भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.