Boat Capsize in Nigeria: नायजेरियात मोठी दुर्घटना! 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली; 27 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता

गेल्या काही दिवसांपासून बोट उलटल्याच्या घणांमध्ये वाढ झालीय. ताज्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. 100 जण बेपत्ता आहेत.

Photo Credit- X

Boat Capsize in Nigeria: उत्तर नायजेरियाच्या नायजर नदीत शुक्रवारी (29 नोव्हेंबर)रोजी मोठी दुर्घटना घडली. नदीत एक बोट उलटली. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. ज्यात बहुतांश महिला आहेत. नायजरच्या राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते इब्राहिम औडू यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की सुमारे 200 प्रवासी बोटीत होते. सर्व लोक कोगी राज्यातून शेजारच्या नायजर राज्यात जात होते.

कोगी स्टेट इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या प्रवक्त्या सँड्रा मोसेस यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बचाव पथकांना नदीतून 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर अजूनही इतरांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर 12 तासांपर्यंत एकही जिवंत व्यक्ती सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बोट उलटण्याचे कारण अस्पष्ट

बोट उलटण्याच्या कारणाची स्पश्टता अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. परंतु स्थानिक माध्यमांनी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त नागरिक असल्याचे म्हटले. दुर्गम भागात रस्ते नसल्यामुळे अनेक लोकांकडे बोटीशिवाय पर्यायी मार्ग नाही.

नायजेरियात बोट उलटणे सामान्य

आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. कारण अधिकारी जलवाहतुकीसाठी सुरक्षा उपाय आणि नियमांची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक प्रवाशांना घेऊन जाणे, बोटींची नादुरूस्ती, क्षमतेपेक्षा जास्त जण बाहूण नेणे आणि देखभालीचा अभाव ही सर्व दुर्घटनांची कारणे आहेत.