Mahaparinirvan Din 2024 Special Trains: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 12 अनारक्षित विशेष फेर्या; पहा तपशील
थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो.
Mahaparinirvan Din 2024 Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2024) मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 12 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान 4 स्पेशल धावतील, 1 स्पेशल कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावेल. 'महापरिनिर्वाण दिन' दरवर्षी 6 डिसेंबर रोजी असतो. थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो.
देशभरातून महापरिनिर्वाण दिनी बौद्ध धर्मीय दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी मोठी गर्दी करतात. म्हणून महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे अनारक्षित विशेष फेर्या चालवणार आहेत. (हेही वाचा: 12th Vasai-Virar Marathon: पश्चिम रेल्वे 8 डिसेंबर रोजी वसई-विरार मॅरेथॉनच्या सहभागींसाठी चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा)
विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे-
नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (4)
- विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4.12.2024 रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.
- विशेष गाडी क्रमांक 01264 ही 5.12.2024 रोजी सकाळी 08.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
- विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूरहून 5.12.2024 रोजी दुपारी 03.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी 10.55 वाजता पोहोचेल.
थांबे- अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर
रचना- विशेष गाडी क्रमांक 01262, 01264 आणि 01266 यामध्ये 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
- विशेष गाडी क्रमांक 02040 नागपूर येथून 7.12.2024 रोजी दुपारी 01.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
थांबा- अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर
रचना- विशेष गाडी क्रमांक 02040 मध्ये 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
कलबुर्गी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (1)
- विशेष गाडी क्रमांक 01245 कलबुर्गी येथून 5.12.2024 रोजी संध्याकाळी 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबा- गंगापूर रोड, अक्कलकोट, सोलापूर, कुरुडूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.
रचना- 22 सामान्य द्वितीय श्रेणी डबे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या/जाणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.