Baba Siddique Muder Case: 'पोलिसांना घाबरू नका, आपल्याकडे वकिलांची फौज आहे'; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी लॉरेन्स बिश्नोईने थेट आरोपीशी साधला होता संवाद
मुख्य शूटर शिवकुमार गौतम (Main Shooter Shivkumar Gautam) ने खुनाची योजना आखताना लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
Baba Siddique Muder Case: राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या (Baba Siddique Murder Case) तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या एका आरोपीने महत्त्वपूर्ण दावा केला असून कटाच्या वेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) शी थेट संवाद साधल्याचं म्हटलं आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या तुरुंगात बंद आहेत. मुख्य शूटर शिवकुमार गौतम (Main Shooter Shivkumar Gautam) ने खुनाची योजना आखताना लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
गौतमने दावा केला की, बिश्नोईने त्याला आश्वासन दिले की, गुन्ह्यानंतर पोलिसांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्याच्या अटकेनंतर लवकरच त्याला तुरुंगातून मुक्त करण्याची व्यवस्था केली जाईल. आरोपी गौतमने दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने त्याला खून करण्यासाठी 12 लाख रुपयांची हमी दिली. तसेच कोठडीतून सुटल्यावर त्याला परदेशात पाठवण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले होते. (हेही वाचा - Baba Siddique Murder Case: मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शूटर शिवाला नेपाळ सीमेजवळ अटक)
बिश्नोईने आरोपीला त्याची सुटका करण्यासाठी आपल्याकडे वकिलांची मोठी टीम असल्याचं म्हटलं होतं. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव आता ठळकपणे समोर आले आहे. तसेच त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याचा देखील या कटाशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे मुलगा जीशानच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (हेही वाचा - -Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात प्लॅन-बी आला समोर; चौकशीत आरोपींनी केले अनेक खुलासे)
दरम्यान, या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी लॉरेन्सने सिद्दीकी यांचा बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी जवळचा संबंध असल्याचे कारण देत त्यांची हत्या केल्याचा दावा केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी या कटात सामील असणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.