Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भात (Baba Siddique Murder Case) मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मुख्य आरोपी शूटर शिवाला नेपाजवळ अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच्या हत्येत प्रामुख्याने 6 जणांचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याचबरोबर या हत्येशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी हरीश बलकराम निषादला पोलिसांनी बहराइचमधून 15 ऑक्टोबरला अटक केली होती. यापूर्वी पोलिसांनी गुरमेल बलजीत सिंग, प्रवीण लोणकर, धर्मराज राजेश कश्यप यांना अटक केली होती. बाबा सिद्दिकीवर गोळ्या झाडणारा शिवकुमार गौतम उर्फ शिवा फरार होता. शिवा हा उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील गंडारा गावचा रहिवासी आहे. (हेही वाचा -Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात प्लॅन-बी आला समोर; चौकशीत आरोपींनी केले अनेक खुलासे)
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक -
Baba Siddiqui murder case | In a joint operation with UP STF, a team from the Mumbai Crime Branch, comprising 6 officers and 15 personnel, has apprehended the shooter in the Baba Siddiqui murder case, Shiva Kumar, along with two other accused in Uttar Pradesh. They are being… pic.twitter.com/tKTHQeqs6g
— ANI (@ANI) November 10, 2024
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद जीशान अख्तर याची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पंजाबमधील नकोदर येथील आकार गावचा रहिवासी आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे.