Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबईमधील 527 संरचना जीर्ण म्हणून घोषित; 30 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक
नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल.
Navi Mumbai Dilapidated Buildings: नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेमध्ये, नवी मुंबईतील एकूण 527 बांधकामे 2024-25 या वर्षासाठी जीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. ज्या संरचनांची यादी जाहीर करण्यात आली त्या संरचनांची स्थिरता समजून घेण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. नागरी संस्थेने शहरातील 30 वर्षांवरील सर्व बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य केले आहे. नियमानुसार, इमारत पहिल्यांदा ताब्यात घेतल्यापासून किंवा भोगवटा प्रमाणपत्र जारी केल्यापासून, 30 वर्षांचा कालावधी मोजला जातो. हे ऑडिट नोंदणीकृत बांधकाम अभियंता किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या पॅनेलमध्ये सूचीबद्ध केलेल्या स्ट्रक्चरल अभियंत्याद्वारे केले जाईल.
याबाबत 31 मार्च 2025 पूर्वी संबंधित प्रभाग कार्यालय किंवा नगररचना विभागाकडे लेखापरीक्षण आणि अहवाल सादर करायचा आहे. नागरी संस्थेने घालून दिलेल्या निकषांचे पालन न करणाऱ्यांना दंड भरावा लागेल. राज्य महानगरपालिका अधिनियम, कलम 3948 A ची तरतूद, सोसायटीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून न घेतल्यास, 25000 रुपये किंवा त्या संबंधित मालमत्तेच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम, या पैकी जि रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड भरावा लागेल. (हेही वाचा: Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग)
नवी मुंबई महानगरपालिकाद्वारे सर्वेक्षण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (MMCA) च्या कलम 264 नुसार उप-कलम 1,2,3 आणि 4 नुसार केले जाते. पुनर्विकास सुरू असलेल्या आणि 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीत बांधलेल्या इमारतींसाठी, नागरी संस्थेने आता आयआयटीमार्फत ऑडिट करून घेणे बंधनकारक केले आहे. 30 वर्षांखालील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी फेरफार केल्याची उदाहरणे यापूर्वी नागरी संस्थेला आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.