Air India Pilot Srishti Tuli Death Case: एअर इंडिया पायलट सृष्टी तुली हिची आत्महत्या नव्हे हत्या झाली; कुटुंबीयांचा आरोप

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

Srishti Tuli | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Crime News: सृष्टी हिचा मृतदेह मुंबई येथील अंधेरी येथील मरोळ परिसरात ती भाड्याने राहात असलेल्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. तिने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती होती. तसेच, तिने आत्महत्या केली असावी, असाही संशय व्यक्त होत होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 27 वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आदित्य पंडित असे या तरुणाचे नाव असून, तो सृष्टीचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आणि तपास सुरू आहे.

पायलटच्या कुटुंबीयांचा दावा काय?

एअर इंडिया कंपनीची महिला पायलट सृष्टी तुली यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांमध्ये म्हटले आहे की, सृष्टी हिने तिच्या मृत्यूपूर्वी जवळपास 15 मिनीटेच आगोदर तिची आई आणि मावशी यांच्याशी संवाद साधला होता. या वेळी ती त्यांच्याशी आनंदात आणि अगदी सामान्यपणे बोलत होती. दरम्यान, तिच्या मृत्यूची बातमी समजली. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबीयांशी बोलल्यानंतर थोड्याच वेळात, तिच्या प्रियकराला तिच्या फ्लॅटचा दरवाजा कुलूपबंद आढळला. त्यामुळे त्याने (आदित्य पंडित) दुसरा पायलट आणि चावी बनवणाऱ्याच्या मदतीने घरात शिरला असता डेटा केबलने गळफास घेतलेल्या अवस्थेत सृष्टी त्याला आढळून आली. त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तिला मृत घोषीत करण्यात आले. (हेही वाचा, Air India Pilot Found Dead in Mumbai: मुंबईतील फ्लॅटमध्ये आढळला एअर इंडियाच्या महिला पायलटचा मृतदेह; प्रियकरास अटक)

कुटुंबीयांकडून प्रियकारवर मानसिक छळाचे आरोप

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये राहणाऱ्या सृष्टीच्या कुटुंबीयांनी आदित्यने तिचा मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी केलेले आरोप खालील प्रमाणे:

दरम्यान, सृष्टीने आत्महत्या केली त्या वेळी आणखी एक महिला पायलट तेथे उपस्थित होती. तिच्यावरही संशय घेतला जात आहे. अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी दिल्लीतील एका व्यावसायिक उड्डाण अभ्यासक्रमादरम्यान सृष्टी आदित्यला भेटली. पायलटचा परवाना मिळवल्यानंतर ती मुंबईला गेली, तर फरिदाबादमध्ये राहणारा आदित्य तिला वारंवार भेटायला यायचा. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.



संबंधित बातम्या