Priyanka Gandhi Vadra takes Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan यांनी घेतली खासदारकीची शपथ; लोकसभेत घुमला मराठी आवाज
प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार म्हणून शपथ घेतली, तर नांदेड पोटनिवडणुकीचे विजेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मातृभाषेत मराठीमध्ये शपथ घेतली.
काँग्रेस (Congress Party) नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) आणि रवींद्र वसंतराव चव्हाण (Ravindra Vasantrao Chavan) यांनी आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. या वेळी दोन्ही खासदारांनी हातात राज्यघटना घेत, जय संविधान अशी घोषणाही दिली. उल्लेखनीय असेकी, रवींद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ मराठीमध्ये घेतली. दरम्यान, पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या (Wayanad MP) खासदार म्हणून आपल्या कार्यकाळाला आजपासून अधिकृतपणे सुरुवात केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या दोन्ही सदस्यांनी शपथ घेतली.
राहुल गांधी यांनी दिला होता सदस्यत्वाचा राजीनामा
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून राहूल गांधी यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. मात्र, त्यांना नियमानुसार कोणत्याही एकाच ठिकाणाहून लोकसभेवर प्रतिनिधित्व करता येणार असल्याने त्यांनी वायनाड येथील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या ठिकाणी ते 3,64,422 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेस पक्षाने राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली. ज्यामध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाच्या नव्या हरिदास यांचा 4,10,931 मतांनी पराभव केला. (हेही वाचा, Priyanka Gandhi Vadra to Take Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan घेणार खासदारकीची शपथ; जाणून घ्या ठळक मुद्दे)
शपथ घेताना प्रियंका गांधी
गांधी कुटुंब संसदेत
राहुल गांधी आणि प्रियंका हे दोन्ही बहिण भाऊ लोकसभेत दाखल झाल्यान काँग्रेस पक्षाचा आवाज वाढला आहे. त्यासोबतच जवळपास संपूर्ण गांधी कुटुंबीयच संसदेत सदस्य म्हणून सक्रीय आहे. या दोन्ही भावंडाच्या मातोश्री सोनिया गांधी नुकत्याच राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. या निमित्ताने नेहरु गांधी कुटुंबातील राजकीय आणि संसदीय परंपरा पुन्हा एकदा मजबुतीने उभा राहिली आहे. (हेही वाचा, Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर)
शपथ घेताना रवींद्र चव्हाण
रवींद्र वसंतराव चव्हाण यांची मराठीत शपथ
दरम्यान, नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेले रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीही खासदार म्हणून शपथ घेतली. विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते चव्हाण यांनी निर्णायक बहुमताने ही जागा जिंकली. आपल्या मुळांशी प्रामाणिक राहून चव्हाण यांनी आपली मातृभाषा मराठीमध्ये शपथ घेतली, जे महाराष्ट्रातील लोकांशी असलेले त्यांचे दृढ नाते प्रतिबिंबित करते.
प्रियंका गांधी वाड्रा आणि रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी शपथ घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या संसदीय प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. दोघांचेही विजय हे संपूर्ण भारतात आपली राजकीय स्थिती मजबूत करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे.