बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा पानिपतचं पहिलं पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे. त्यासोबतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'इतिहासाला कलाटणी देणारं युद्ध-पानिपत: एक महान विश्वासघात' असे या पोस्टर वर लिहिण्यात आले आहे.
जेव्हा ह्या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात याबाबत उत्सुकता होती. एकतर पानिपतासारखी दीर्घ कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आणि दुसरं म्हणजे आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार, या दोन कारणांमुळे ती शिगेला पोचली होती. हा सिनेमा कधी प्रेक्षागृहात जाऊन अनुभवतो असे प्रत्येक मराठी मनुष्याला वाटत होते.
आशुतोष गोवारीकर म्हटलं की भव्यदिव्यता, इतिहासाचं उदात्तीकरण आणि कलाकारांची मांदियाळी या गोष्टी आल्याच. पानिपतही याला अपवाद नसणार आहे. या सिनेमातही उत्तम कलाकारांची फौज उभी करण्यात अली आहे. अर्जुन कपूर, करिती सनोन, संजय दत्त या मुख्य कलाकारांसोबतच पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल आणि झीनत अमान सारखे कसलेले कलाकारही असणार आहेत.
Come Witness The Battle That Changed History, #Panipat.
In Cinemas December 6th.@duttsanjay @arjunk26 @kritisanon #SunitaGowariker @RohitShelatkar @agppl @visionworldfilm @RelianceEnt @ZeeMusicCompany pic.twitter.com/vUVrwfDw60
— Ashutosh Gowariker (@AshGowariker) November 1, 2019
याविषयी बोलताना निर्मात्या सुनीता गोवारीकर म्हणतात,''आमचा हा सिनेमा मराठ्यांच्या महान वैभवाचे दर्शन घडवेल आणि इतकेच नाही तर ज्या महाकाय अशा युद्धात एक लाखाहून अधिक सैनिक शहीद झाले होते ती लढाई आणि त्यामागील कारणे देखील दाखवेल. ऐतिहासिक महत्व असलेली ही एक महान कथा आहे.'' (हेही वाचा. Tanhaji चित्रपटानंतर देशातील अन्य स्वातंत्र्य सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची एक मालिकाच काढण्याची Ajay Devgn ची योजना)
पानिपत चित्रपटाची कथा ही पानिपताच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी अशी लढाई 14 जानेवारी 1761 ला सदाशिवभाऊ पेशवांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दाली यांच्या मध्ये लढ़ली गेली होती.