Baby John Released Date: वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज आता चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. डिसेंबर 2024 मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट संपूर्ण जगभरात एकाच दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुणसोबत अभिनेत्री किर्थी सुरेश हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तसेच वामिका गब्बी देखील झळकणार आहे. (हेही वाचा: Pill Trailer Out: रितेश देशमुख करणार फार्मा कंपनीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 'पिल' वेब सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Watch Video))
या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. कलीस्वरुन यांनी केले आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाआधी 'जवान' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ॲटली चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत. 'बेबी जॉन' हा ॲटली यांचात दिग्दर्शित 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2016मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये मु्ख्य भूमिकेत दक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि समांथा रुथ प्रभू होते.
View this post on Instagram
डिसेंबर 2024 मध्ये वरुण धवनच्या 'बेबी जॉन'सह बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'वेलकम 3', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर 2' आणि 'मुफासा' 20 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. 'बेबी जॉन' चित्रपटाव्यतिरिक्त वरुण धवन 'स्त्री 2' , 'एक्कीस' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.