Bigg Boss OTT 3: 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनची स्पर्धक; अनिल कपूर करणार शो होस्ट
Photo Credits Instagram

Bigg Boss OTT 3: 'वडा पाव गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित(Chandrika Dixit) बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनसाठी स्पर्धक असण्याची पुष्टी झाली आहे. गेल्या अनंक दिवसांपासून ती बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनची स्पर्धक असण्याची चर्चा होती. परंतू आता ते खरं ठरलं आहे. त्याबाबतची घोषणा JioCinema च्या अधिकृत Instagram अकाऊंटवरून करण्यात आली. "#BiggBossOTT3 चा पहिला स्पर्धक कोण आहे? या #TeekhiMirchi ची एक झलक पाहण्यासाठी #JioCinemaPremiun वर जा. Bigg Boss OTT 3 स्ट्रीम फक्त JioCinema Premium वर 21 जूनपासून (9pm). " असे पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.(हेही वाचा:Bigg Boss Ott Season 3: अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी-3’ चे होस्टींग करणार; शोचा नवा प्रोमो समोर )

बिग बॉस OTT S3 मध्ये चंद्रिका दीक्षित - सहभागीची पुष्टी केली

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

चंद्रिका बनवत वडा पाव व्हिडिओ

चंद्रिकाचा वादग्रस्त व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Upadhyay (@foodbowlss)

कोण आहे चंद्रिका दीक्षित उर्फ ​​'वडा पाव गर्ल'?

दिल्लीतील सैनिक विहार येथील एका स्टॉलवर वडा पाव विकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चंद्रिका दीक्षित प्रसिद्धीस आली. तिने यापूर्वी हल्दीराम येथे काम केले होते परंतु तिच्या मुलाला डेंग्यू झाल्यामुळे तिने नोकरी सोडली.त्यानंतर तिने तिचा वडापावचा व्यवसाय सुरू केला.