Lok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात?
उर्मिला मातोंडकर (Photo Credit : Instagram)

आसावरी जोशी, शिल्पा शिंदे नंतर आता बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आगामी लोकसभा निवडणूकींच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षामध्ये (Congress) प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकांमध्ये भाजप-शिवसेना युतीच्या गोपाळ शेट्टींच्या विरोधात कॉंग्रेस उर्मिला मातोंडकरला उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप उर्मिला किंवा कॉंग्रेसकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये शत्रुघ्न सिन्हा , 'जयकांत शिक्रे' फेम अभिनेता प्रकाश राज लोकसभा निवडणूक 2019 लढणार  आहेत. सोबतच हेमा मालिनीदेखील रिंगणात उतरल्या आहेत. काही दिवसांपासून सलमान खान मतदानासाठी रिंग़णात उतरणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता खूद्द सलमान खाननेच ट्वीट करून या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबईतून लढण्यासाठी शिल्पा शिंदे आणि आसावरी जोशीदेखील उत्सुक होत्या. नुकताच डान्सर सपना चौधरीदेखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा होत्या. मात्र तिनेच हे वृत्त फेटाळलं.उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वी 'माधुरी' या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. सध्या बॉलिवूड आणि मराठी सिनेमांपासूनही दूर होते.