A file image of Prakash Raj. | Image Courtesy: Facebook

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) आगामी लोकसभा निवडणूक (Parliament Elections) लढणार असल्याचं माहिती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. तामिळ, कन्नड सिनेमांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे प्रकाश राज लवकरच निवडणुकींच्या रिंगणात उतरणार आहेत. अनेकदा मोदी सरकार विरुद्ध प्रकाश राज यांनी परखड भूमिका घेतली होती. मोदींवर टीका केल्याने प्रकाश राज अनेकदा चर्चेमध्ये आले होते.

प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या राजकारणाप्रवेशाबद्दल माहिती देताना प्रकाश राज कोणत्याही पक्षात सहभागी न होता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच 'मतदारसंघाबाबतची माहिती लवकरच देईन. अब की बार जनता की सरकार! ' असं म्हणत मोदी सरकारच्या टॅग लाईनची खिल्ली उडवली आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचे नशिबाचे निकाल लागणार

प्रकाश राज विरुद्ध मोदी सरकार

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. समाजात कलाकार आणि विचारवंत यांची होणारी गळचेपी पाहून अनेकदा भाजपा सरकारच्या भूमिकेवर टीका केल्याचे प्रकाश राज यांनी सांगितले आहे. सोशल मीडियामध्ये अनेकदा प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे,