Urfi Javed (Photo- Instagram)

बिग बॉस ओटोटी मुळे प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियात खुप अॅक्टिव्ह असते. तर तिच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक वेळी नवा फॅशन लूक पहायला मिळतो. याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा ती शेअर करते. परंतु आता उर्फी हिने एका कास्टिंग डायरेक्टवर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अधिक चर्चेत आली आहे. तिने कास्टिंग डायरेक्टर ओबेद अफ्रिदी याच्यावर असा आरोप लावला की, तिच्या सारख्या लहान मुलींसोबत तो शारिरीक संबंध ठेवण्यास सांगतो.

उर्फी हिने आपल्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरील एका पोस्टमध्ये असे म्हटले की, ओबेद अफ्रिदीवर  तिच्या व्यतिरिक्त बहुतांश तरुणींनी त्याच्या सोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप लावला आहे. उर्फीने असे ही म्हटले की, आपले काम निघून जाते तेव्हा लोक तुम्हाला बदनाम करु लागतात. सर्वात प्रथम ओबेद अफ्रिदी याने माझ्या शूटचे पैसेच दिले नाहीत. (Lock Upp: पतीचा बेदम मार खाणारी अभिनेत्री Nisha Rawal बनली 'लॉक अप'ची पहिली कंटेस्टेंट, पहा प्रोमोची झलक)

अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, जेव्हा मी त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने मला वाईट बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर बहुतांश तरुणी समोर आल्या आणि त्यांनी तो त्यांचे शारिरीक शोषण करत असल्याचे सांगितले. ओबेद याने उर्फी हिला एक म्युझिक व्हिडिओसाठी करार करण्यास सांगितला होता.

Urfi Javed Instagram Story (Photo Credits-Instagram)

पुढे तिने असे म्हटले की, 'मी अनेक लोकांसोबत काम केले आहे. मग सर्व काही चांगले संपले असताना मी तुला का दोष देऊ? हे त्यांच्याकडे उरलेल्या पैशाबद्दल देखील नाही. त्यांच्या वतीने मुलींचे शोषण केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी त्याच्याविरुद्ध (ओबेद आफ्रिदी) लढेन आणि सर्वांना सांगेन की त्याच्या आजूबाजूला मुली सुरक्षित नाहीत. मी कठोर परिश्रम करतो आणि माझे स्वतःचे पैसे मागत आहे. तो गुन्हा नाही.'

याशिवाय उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीविरोधात आणखी काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.