Mai Trailer Out: मुलीच्या मारेकऱ्याच्या शोधात आहे 'माई' साक्षी तन्वर, पहा Netflix च्या थ्रिलर सिरिजचा धमाकेधार ट्रेलर, Watch Video
Mai Trailer - (PC - Twitter)

Mai Trailer Out: Netflix ने त्यांच्या आगामी वेब सिरीज Mai चा ट्रेलर रिलीज केला आहे. ही एक सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज आहे, ज्याची निर्मिती अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माच्या क्लीन स्लॅट्झ कंपनीने केली आहे. अनुष्काने काही दिवसांपूर्वीचं या प्रॉडक्शन कंपनीपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. या सिरिजमध्ये माईची मुख्य भूमिका साक्षी तन्वर (Sakshi Tanwar)ने केली आहे. तर रायमा सेन आणि वामिका गब्बी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे या वेब सिरिजच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

यात साक्षीने एका आईची भूमिका साकारली आहे. जी आपल्या मुलीच्या मारेकऱ्याच्या शोधात निघते. आपल्या मुलीची हत्या का झाली, या प्रश्नाचे उत्तर तिला हवे आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला साक्षीच्या डोळ्यांसमोर मुलगी बनी वामिका गब्बीला ट्रकने धडकवले जाते. आपल्या मुलीच्या मारेकऱ्याचा शोध घेत असताना साक्षीला धमक्या मिळतात. तिला पुढील तपास न करण्यास परावृत्त केलं जातं. तिच्यावर प्राणघातक हल्लेदेखील केले जातात. या सिरिजचा ट्रेलर प्रेक्षकांना कथेबद्दल उत्सुकता निर्माण करणारा आहे. (हेही वाचा - हेही वाचा - Beast Release Date: सुपरस्टार विजय थलपथी याचा 'Beast' हा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित)

'माई' या वेबसिरीजच्या केंद्रस्थानी दोन भावांचे चौधरी कुटुंब आहे. जे एकाच कॉलनीत आपल्या जोडीदार आणि मुलांसह शेजारच्या घरात राहतात. शील ही धाकट्या भावाची बायको. ती पूर्ण समर्पणाने आपले कुटुंब व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करते. पण एक वळण येते ज्यामुळे शील गुन्ह्याच्या जगात खोलवर जाते. माई 15 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

वेब सीरिजबद्दल बोलताना, निर्माता कर्णेश शर्मा म्हणाले, “आम्ही नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ही कथा जगासमोर आणण्यास उत्सुक आहोत. माई एका कणखर आईच्या प्रवासाची चित्तथरारक पण भावनिक कथा सांगते. शील ही एक बहुआयामी पात्र आहे. जी आपल्या मुलीचा बदला घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर मात करण्यासाठी लढते."