Suyash Tilak Engagement Photos: अभिनेता सुयश टिळक ने लेडी लव्ह आयुषी भावे सोबत केला साखरपुडा; इथे पहा फोटोज
सुयश टिळक । Photo Credits: Aayushi Bhave

सध्या 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेतून पुन्हा घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) काही दिवसांपूर्वी रिल लाईफ मध्ये बोहल्यावर चढला होता पण आता त्याच्या रिअल लाईफ मध्येही तो मैत्रिण आयुषी भावे (Aayushi Bhave) सोबत एकत्र आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. आज (7 जुलै) आयुषीच्या बर्थ डे च्या निमित्ताने सुयश आणि आयुषीने ही गोड बातमी शेअर केली आहे. दोघांनीही इंस्टाग्राम पोस्ट द्वारा त्यांच्या रिलेशनशीप आणि साखरपुड्याची माहिती दिली आहे. दरम्यान सुयश आणि आयुषीच्या साखरपुड्यामध्ये दाक्षिणात्य लूक पहायला मिळाला आहे.

दाक्षिणात्य पद्धतीने पांढरा शर्ट आणि लुंगी मध्ये सुयश पहायला मिळाला तर हिरव्या साडीमध्ये आणि दाक्षिणात्य दागिन्यांनी आयुषीचा लूक केलेला होता. त्यांच्या फोटोमध्येही मागील सजावट दाक्षिणात्य पद्धतीची होती. दरम्यान आयुषी ही देखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे. झी युवा वरील डांसिंग क्वीन मध्ये आयुषी सहभागी होती. त्यामुळे अभिनयासोबतच नृत्यकला ही आयुषीची पसंत आहे.

सुयश टिळक पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयश टिळक याने साखरपुड्याची बातमी शेअर करताना आयुषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासाठी एक खास पोस्ट देखील लिहली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

आयुषी भावे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

आयुषीने देखील गोड अंदाजात तिच्या साखरपुड्याची माहिती दिली आहे.(नक्की वाचा: Suyash Tilak In Khali Peeli: सुयश टिळक ची बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री, अनन्या पांंडे व ईशान खट्टर च्या खाली पिली मध्ये साकारतोय विलन (PHOTOS)).

दरम्यान सुयश-आयुषीच्या अचानक आलेल्या साखरपुड्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांना आयुष्याच्या या नव्या टप्प्याची सुरूवात करताना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अभिनेत्री गिरीजा प्रभुणे, सायली संजीव यांचा त्यामध्ये समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुयश टिळक याचं नाव अभिनेत्री अक्षया देवधर सोबत जोडलं जात होते. आगामी बिग बॉस 3 मध्ये हे ब्रेक अप झालेलं कपल दिसणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे. पण अद्याप कोणत्याही स्पर्धकाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.