Sunil Grover Comedy Video: सुनील ग्रोवर ने टोपी बहु बनून 'साथ निभाना साथिया' मधील लॅपटॉप सीन केला रीक्रिएट; पहा मजेशीर व्हिडिओ
Sunil Grover Comedy Video(Photo Credits: Instagram)

Sunil Grover Comedy Video: सुनील ग्रोवर यांनी आतापर्यंत अनेक मजेशीर भूमिका करत प्रेक्षकांना लोटपोट हसायला लावलं आहे. कॉमेडी शो असो किंवा एखादा पुरस्कार सोहळा सुनील ग्रोवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. सुनील ग्रोवर 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या स्टार भारतवर प्रदर्शित होणाऱ्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहेत. या शोसाठी त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे.

सुनील ग्रोवरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अत्यंत कॉमेडी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनीलने 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhana Saathiya) मालिकेतील गोपी बहु (Gopi Bahu) चा लॅपटॉप सीन रीक्रिएट केला आहे. यात सुनीलने गोपी बहु ऐवजी टोपी बहु (Topi Bahu) बनून लॅपटॉपची पाणी, साबण, ब्रश आदीने सफाई करताना दिसत आहेत. (हेही वाचा - Bollywood Drugs Controversy: रवि किशन यांनी लोकसभेत उठवलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्द्यावर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं)

 

View this post on Instagram

 

Topi Bahu . Ghar ke kaam karegi aaj raat 8baje @starbharat par

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

दरम्यान, सुनीलने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून शेअर करताना म्हटलं आहे की, 'टोपी बहु आज रात्री 8 वाजता स्टार भारतवर घरातील सर्व काम करील.' सुनील ग्रोवरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.