Shreyas Talpade चं मराठी टेलिव्हिजन वर पुनरागमन; ‘माझी तुझी रेशीमगाठ' मधून रसिकांच्या भेटीला; पहा प्रोमो
Shreyas Talpade | PC: Instagram

एकेकाळी 'आभाळमाया', 'बेधुंद मनाची लहर' आणि अवंतिका अशा लोकप्रिय मालिकांचा भाग असलेला श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता पुन्हा मराठी टेलिव्हिजन वर परत येत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath)ही त्याची आगामी मालिका असून नुकताच त्याचा पहिला प्रोमो रीलीज करण्यात आला आहे. ही मालिका लवकरच झी मराठी वर प्रसारित केली जाणार आहे. दरम्यान एका चिमुकलीसोबत श्रेयस ' लग्नावर गप्पा' मारताना दिसत आहे. ही एक लव्ह स्टोरी असणार आहे. श्रेयसच्या विरूद्ध कोण अभिनेत्री असेल हे मात्र या प्रोमो मध्ये गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. श्रेयस सोबत दिसणारी ही चिमुकली मायरा आहे. युट्युब वर Myra's Corner या चॅनल द्वारा ती इंटरनेट वर प्रसिद्ध आहे.

काही दिवसांपूर्वीच श्रेयस ने त्याच्या करियरला लागलेल्या ब्रेक वर बोलताना एका मुलाखतीमध्ये सिनेक्षेत्रात त्याला आप्तांकडून, जवळच्या लोकांकडून विश्वासघाताला सामोरं जावं लागल्याची खदखद बोलून दाखवली होती. त्यानंतर आता श्रेयस मराठीत पुनरागमन करत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार श्रेयस सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: अजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी.

 'माझी तुझी रेशीमगाठ' प्रोमो 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

दरम्यान झी मराठी कडून 'माझी तुझी रेशीमगाठ' सोबत आज ‘मन झालं बाजिंद’या अजून एका मालिकेचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वी झी ने ‘ती परत आलीये’ही अजून एक मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 ला सुरू होत असल्याची घोषणा केली आहे.