Ghost in Bigg Boss House: धक्कादायक! बिग बॉसच्या घरात भूत? लहान मुलीच्या सावल्या दिसल्याचा Rajiv Adatia चा दावा
Representational Image (Photo Credits: Pixabay)

'बिग बॉस 15' मधील स्पर्धक राजीव अदातिया घराबाहेर पडल्यानंतर त्‍याच्‍या चाहत्यांना धक्का बसला होता. राजीव हा या सिझनमधील मनोरंजक स्पर्धक होता आणि प्रेक्षकांना त्याचा खेळ आवडला होता. पण डबल एलिमिनेशनमध्ये राजीव अदातिया 'बिग बॉस 15' मधून बाहेर पडला. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राजीव अदातियाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजीवने दावा केला की त्याने बिग बॉसच्या घरात भूत पाहिले होते आणि त्यामुळे त्याला नीट झोपही येत नव्हती.

प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा 15 वा सीझन शेवटच्या महिन्यात दाखल झाला आहे. फायनलची तयारी सुरू असतानाच या शोबाबत असा एक प्रकार समोर आला आहे, ज्यावर विश्वास बसणे कठीण आहे. बिग बॉसच्या घरात भूत दिसले असून ते कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाल्याचा दावा केला गेला आहे. ETimes शी केलेल्या संभाषणात राजीव अदातियाने सांगितले की, त्याने बिग बॉसच्या घरात एक लहान मुलगी पहिली आहे व लाईव्ह फीडमध्येही हे भूत दिसले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला घरात सावल्या दिसत होत्या.

राजीव अदातिया म्हणाला, ‘मी बिग बॉस 15 च्या घरात दोनदा भुत पाहिले आणि मी घाबरलो. मी घरात झोपायला नकार दिला. उमर रियाझ, निशांत भट्ट आणि मी तिथे होतो. अचानक निशांत आणि मी उभे राहिलो, तिथे घरात आम्हाला लहान मुलगी दिसली. आम्ही भयंकर घाबरलो होतो आणि विचार करत होतो की ही लहान मुलगी घरात कुठून आली? ती आमच्या जवळून गेली. हा विनोद नाही, बिग बॉसच्या घरात खरेच भूत आहे.’

राजीवच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर निशांत, उमर आणि प्रतीक घाबरले होते. दरम्यान, राजीव अदातिया गेल्या आठवड्यातच बिग बॉस 15 च्या घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडल्यानंतर तो त्याची राखी बहीण शमिता शेट्टीला सपोर्ट करताना दिसत आहे. शोमध्ये राजीव आणि उमर रियाझची मैत्री पाहण्यासारखी होती. राखी सावंतचा पती रितेशसोबत राजीव बाहेर पडला होता.