Sharmishtha Raut Wedding: बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत हिचे लवकरच होणार शुभमंगल सावधान! अभिनेत्रीने सोशल मिडियावर शेअर केली निमंत्रण पत्रिका
Sharmishtha Raut Wedding (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी सीजन 1 (Bigg Boss Marathi 1) मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली आणि टॉप 5 मध्ये पर्यंत पोहोचलेली स्पर्धक अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishta Raut) हिने नुकतीच तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट आपल्या लग्नाची पत्रिका पोस्ट केली आहे. जून महिन्यात शर्मिष्ठा आणि तेजस देसाई (Tejas Desai) यांच्या साखरपुडा झाला होता. लॉकडाऊनच्या काळात अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून त्यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ते लग्नबेडीत अडकणार आहेत. थोडक्यात लॉकडाऊनमध्ये तिचा साखरपुडा झाला असून आता लॉकडाऊन मध्येच ती लग्न करणार आहे.

येत्या 11 ऑक्टोबरला या दोघांचे लग्न होणार असून साखरपुड्याप्रमाणे अगदी साध्या आणि कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा होणार आहे. शर्मिष्ठाने सोशल मिडियावर निमंत्रण पत्रिका शेअर करुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या पोस्ट खाली 'मी माझ्या आयुष्यीताल माझ्या प्रिय जोडीदारासोबत नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे, यात तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवेत' असे शर्मिष्ठाने म्हटले आहे. Sharmishtha Raut Engagement: बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत हिचा तेजस देसाईसोबत साखरपुडा; अवघ्या 35 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा (See Photo)

शर्मिष्ठा राऊतचे हे दुसरे लग्न आहे. शर्मिष्ठाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने मन उधाण वा-याचे, जुळून येती रेशीमगाठी, कुंपण, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श या चित्रपटांतही काम केले आहे.