तेजस देसाई व शर्मिष्ठा राऊत (Photo Credit : Instagram)

बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने प्रवेश केला होता. शर्मिष्ठाच्या फटकळ बोलण्याने बिग बॉसमधील वातावरण काही प्रमाणात तापले होते. त्यावेळी शर्मिष्ठाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या. आता शर्मिष्ठाचा नुकताच साखरपुडा (Engagement) पार पडला आहे. अगदी मोजक्याच 35 लोकांच्या उपस्थितीमध्ये शामिष्ठाने साखरपुडा केला आहे. तेजस देसाई (Tejas Desai) असे शार्मिष्ठाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. इगतपुरीमधल्या रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये हा साखरपुडा पार पडला. येत्या ऑक्टोबरमध्ये शर्मिष्ठा आणि तेजस लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, ‘आमचा साखरपुडा 31 एप्रिल रोजी होणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे आम्हाला ते शक्य झाले नाही. आता निर्बंध थोडे शिथिल झाल्याने आम्ही साखरपुडा करण्याचे निश्चित केले. अर्थात आम्ही सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे आपण पालन करणार आहोत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejas Desai (@tejas.desai.1044) on

या साखरपुड्याला फक्त 35 लोक उपस्थित होते. याबाबत बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, ‘आमच्या दोन्ही कुटुंबातील जवळचे नातलगच या समारंभाचा हिस्सा आहेत. माझे सहकारी आणि मित्र सध्याची परिस्थिती समजून सहकार्य करीत आहे. मी आशा करते की, आमच्या लग्नाची तारीख निश्चित होईपर्यंत परिस्थिती ठीक झाली असेल व त्यावेळी मी सर्वांना आमंत्रित करू शकेन.’ (हेही वाचा: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार लंडनची सून; Fiancé कुणाल बेनोडेकर सोबतचे साखरपुड्याचे फोटो केले शेअर (See Photos))

या समारंभासाठी लॉक डाऊनच्या सर्व नियमांचे पालन होताना दिसत आहे. पाहुण्यांना हॉलमध्ये घालण्यासाठी वेगळ्या चप्पलची सोय आहे. प्रत्येकाला ग्लोव्ह आणि मास्क देण्यात आले आहेत व काटेकोर स्वच्छता आहे. बुफे पद्धतीचे जेवण या समारंभात असेल. शर्मिष्ठाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मेहंदीचे व अंगठीचा फोटो पोस्ट केला आहे. ‘आपण भविष्यासाठी तयार असल्याचे’ ती म्हणत आहे. शर्मिष्ठाचे पहिले लग्न अमेय निपाणकर नावाच्या तरूणासोबत झाले होते. अमेयसोबत शर्मिष्ठाचे लव्हमॅरेज होते व नंतर काही वर्षांनी हा संसार तुटला. आता शर्मिष्ठा पुन्हा एका नव्या नात्याची सुरुवात करत आहे, यासाठी तिला लेटेस्टली मराठीकडून शुभेच्छा.