गेल्या काही महिन्यात शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा देशात एक आवर्जून पाहिला जाणारा शो बनला आहे. आता शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन येऊ घातला आहे. तिसऱ्या सिझनमध्ये विद्यमान 6 शार्क- अमन गुप्ता, अमित जैन, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंग, पीयूष बन्सल, व्यतिरिक्त, 6 नवीन शार्क- रितेश अग्रवाल, दीपंदर गोयल, अझहर इक्बाल, राधिका गुप्ता, वरुण दुआ आणि रॉनी स्क्रूवाला सादर करण्यात आले. आता स्विगी (Swiggy) शार्क टँक इंडिया या रिॲलिटी शोच्या चौथ्या सीझनला 25 कोटी रुपयांमध्ये प्रायोजित करण्यासाठी करार करत आहे.
मात्र स्विगीने करारावर एक अट घातली आहे, ती म्हणजे झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल (Zomato Founder Deepinder Goyal) एक गुंतवणूकदार म्हणून शोमध्ये परतणार नाहीत. मनीकंट्रोलच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. दीपंदर गोयल शार्क टँकच्या शेवटच्या सीझनमध्ये जज म्हणून दिसले होते. आता या शोच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू आहे. अशात दीपंदर गोयलला शॉर्ट टँकच्या चौथ्या सीझनचा भाग न बनवण्याची स्विगीची अट त्याच्या आयपीओमुळे असू शकते असे म्हटले जाते.
स्विगी आणि झोमॅटो यांच्यातील खाद्यपदार्थ आणि किराणा मालाच्या डिलिव्हरीमध्ये स्पर्धा अनेक पटींनी वाढली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत दोन्ही कंपन्या एकाच पातळीवर होत्या, पण अलीकडच्या काळात झोमॅटोने बाजारात आपले स्थान मजबूत केले आहे. यामुळे स्विगीच्या मार्केटिंग खर्चातही वाढ झाली आहे, कारण कंपनी आपल्या आयपीओची तयारी करत आहे. स्विगीला आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. स्विगीने आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे की, ते सुमारे 3,750 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यापैकी 950 कोटी रुपये ब्रँड मार्केटिंगसाठी खर्च केले जातील. (हेही वाचा; Swiggy Launches 'Bolt' Service: स्विगी कंपनीने सुरु केली बोल्ट सेवा,10 मिनीटात फूड डिलेव्हरीचे दिले आश्वासन)
सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या 'शार्क टँक इंडिया' शोच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे. या हंगामात शार्क पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या दीपिंदर गोयल यांनी आपले भेदक प्रश्न आणि संवाद यामुळे खूप प्रशंसा मिळवली. शोमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली होती. मात्र आता स्विगी पुढील सिझन प्रायोजित करत असल्याने, गोयल चौथ्या सिझनचा हिस्सा असण्याची शक्यता फार कमी आहे.