OTT वर Salman Khan नाही करणार Bigg Boss 15 चे होस्टिंग; 'या' अभिनेत्याची लागू शकते वर्णी
Bigg Boss (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड भाईजान सलमान खान (Salman Khan) याचा टीव्ही रियालिटी शो बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या तयारीला सुरुवात झाली आहे. चाहते देखील शो ची अगदी आतुरतेने शो ची वाट पाहत आहेत. दरम्यान, हा शो ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर टीव्हीवर प्रसारित करण्याच्या 6 आठवड्यांआधी प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. यामुळे चाहते सुखावले होते. मात्र आता या शो बाबत नवी अपडेट समोर येत असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. (टीव्हीच्या आधी 6 आठवडे OTT वर प्रदर्शित होणार बिग बॉस 15; समोर आला नवा ट्विस्ट)

रिपोर्ट्सनुसार, ओटीटीवर सलमान खान हा शो होस्ट करणार नाही. आगामी सिनेमांमध्ये व्यस्त असल्याने सलमान खान ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार नाही. त्याच्या ऐवजी एक नवा होस्ट बिग बॉसला मिळणर आहे, अशी चर्चा आहे. बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला ओटीटीवर शो चे सुत्रसंचालन करणार आहे, असा अंदाज आहे. त्याच्याशिवाय फराह खानचे नाव देखील होस्टिंगसाठी चर्चेत आहे. यापूर्वी सलमान खानच्या गैरहजेरीत फराह खानने 'बिग बॉस 8 हल्ला बोल' चे होस्टिंग उत्तमरित्या केले होते.

यंदाच्या सीजनमध्ये शो मध्ये नवे ट्विस्ट जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शो मध्ये स्वत:ला टिकवून ठेवणे अधिक आव्हानात्मक होणार आहे. साहजिकच स्पर्धा वाढणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या शो मध्ये कॉमनर्स देखील सहभागी होणार असल्याने शो अधिकच मनोरंजक होईल, अशी आशा आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या 6 आठवड्यांत स्पर्धकांना वोट आऊट करण्याची जबाबदारी प्रेक्षकांची असेल आणि त्यांच्या मतांनुसारच स्पर्धकांचे शो मधील स्थान ठरेल. यानंतर उरलेल्या 6-7 स्पर्धकांना शो मध्ये एन्ट्री दिली जाईल.