छोट्या पडद्यावरही सलमान खान याचा जलवा कायम; 'बिग बॉस 13' घेणार 'इतके' मानधन
Salman Khan (Photo Credits: File Photo)

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'भारत' (Bharat) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला केला. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरही सलमान खानचा जलवा पाहायला मिळणार आहे.

लवकरच सलमान बिग बॉस चे (Bigg Boss) 13 वे सीजन होस्ट करताना दिसेल आणि यातूनही सलमान बक्कळ कमाई करणार आहे. मागील सीजनपेक्षा यंदा सलमान सुमारे 100 कोटी अधिक मानधन घेणार आहे. (योगदिनी सलमान खान याचा स्विमिंग पूल मध्ये स्टंट; व्हिडिओची सोशल मीडियात धूम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या सीजनमध्ये सलमानने बिग बॉस 13 साठी टीव्ही चॅनलशी 403 कोटींचा करार केला आहे. प्रत्येक आठवड्यात सलमान दोन दिवस शूटिंग करेल. यात दोन एपिसोड्ससाठी त्याला 31 कोटी रुपये इतके मानधन मिळेल. हा शो 13 आठवडे चालेल. त्यात सलमान 26 एपिसोड्साठी शूट करेल. मागील सीजनमध्ये सलमान खानने सुमारे 300 ते 350 कोटी रुपये मानधन घेतले होते.

सिनेमासोबतच सध्या सलमान टीव्ही शोज मध्ये देखील इनवेस्ट करत आहे. कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' आणि डान्स शो 'नच बलिए' यात देखील त्याने पैसे गुंतवले आहेत. त्याचबरोबर सलमान कलर्स टीव्ही आणि एंडेमोड इंडिया सोबत स्वतःचा टीव्ही शो लॉन्च करेल, अशीही चर्चा आहे.