रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) या मालिकेत दिवसागणिक प्रत्येक पात्राची उलगडणारी भूमिका आणि अनोखा अंदाज पाहता प्रेक्षक नेहमीच आता पुढे काय? या उत्सुकतेत पाहायला मिळतात. मागील काही भागांमध्ये शेवंता आणि अण्णाच्या संबंधांमुळे माई म्हणजेच इंदूचे बदललेले रूप पाहायला मिळतंय, नेहमीच पतीच्या आज्ञेत राहणारी इंदू आता थेट अण्णांवर बंदूक रोखून उभी राहिलेली आपण नुकतेच पाहिले असेल. त्यानंतर दोघांमध्ये वाद आणि अक्षरशः आता पुढचा खून अण्णा इंदूचाच करणार इतपत बिघडलेले नाते सध्या सीरियल मध्ये पाहायला मिळतेय, मात्र एवढ्या सगळ्या राग भांडणाला बाजूला ठेवून आता अण्णा आणि माई चक्क रोमान्स करताना पाहायला मिळत आहे. निसर्ग राजा या मराठमोळ्या गाण्यातील एका छोट्याश्या रोमँटिक कडव्यावर मिस्टर अँड मिसेस नाईक यांचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांनी चक्क या व्हिडीओला डोक्यावर घेतले आहे.
दुर्दैवाने हा रोमान्स तुम्हाला सीरियल मध्ये पाहायला मिळणार नाहीये, मात्र इंस्टाग्राम वर याची एक झलक पाहायला मिळतेय. हा व्हडिओ काहीच वेळात जबरदस्त व्हायरल झाला आहे, झी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
अण्णा माई चा रोमँटिक अंदाज, पहा व्हिडीओ
View this post on Instagram
माई अण्णांचा हटके अंदाज. #ZeeMarathi #RatrisKhelChale2 @nareshakuntala @abhyankarm
View this post on Instagram
शेवटी प्रेक्षकांना दोघांचा romance पाहायला मिळतोय. 😅😅#RatrisKhelChale2 @abhyankarm @nareshakuntala
दरम्यान, अण्णा आणि माई ही मुख्य पात्र माधव अभ्यंकर व शकुंतला नरे या दोघांनी अगदी सुंदररित्या घडवली आहेत. मालिकेच्या पहिल्या सीझन मध्ये अण्णाचे पात्र अवघ्या एका एपिसोडपुरते होते मात्र दुसऱ्या पर्वात या पात्राने जी काही जादू केलीये की मागील काही काळात लहानापासून मोठ्यापर्यंत जो तो अण्णा नाईकचा फॅन झाला आहे. मालिकेत पुढे काय घडते, माई, घर किंवा शेवंता यामधील नेमका कोणता पर्याय अण्णा निवडणार हे तर पुढचे एपिसोड पाहिल्यावरच समजेल, तोपर्यंत या व्हिडिओची मजा घ्या.