कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली. लॉकडाऊनचा सुरुवातीचा कालावधी नागरिकांनी खूप रिलॅक्समध्ये घालवला. मात्र नंतर 24 तास असणारा मोकळा वेळ कसा घालवायचा याचा विचार अनेकांना सतावू लागला. अनेकजण कंटाळले, बोअर झाले. मात्र दूरदर्शनवर पुन्हा सुरु झालेल्या रामायण मालिकेने सर्वच घरात प्रसन्नता आणली. प्रेक्षक या मालिकेचा भरभरुन आस्वाद घेऊ लागले. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण रामायण मालिकेचे पुर्नप्रेक्षपण एन्जॉय करु लागले. (Ravan Vadh Memes: 'रावण वधा'ने रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने घेतला निरोप; सोशल मीडियामध्ये मीम्स व्हायरल)
रामायण मालिकेला मिळणारा प्रतिसाद इतका उदंड होता की या मालिकेने विक्रम रचला. रामायण हा जगातील सर्वाधिक पाहिलेला गेलेला मनोरंजक कार्यक्रम ठरला. 16 एप्रिल रोजी तब्बल 7.7 कोटी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला असल्याची नोंद झाली आहे. यामुळे रामायण मालिकेने 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बिग बँग थेअरी सिजन फिनाले' या कार्यक्रमांनाही मागे टाकले आहे.
DD National Tweet:
WORLD RECORD!!
Rebroadcast of #Ramayana on #Doordarshan smashes viewership records worldwide, the show becomes most watched entertainment show in the world with 7.7 crore viewers on 16th of April pic.twitter.com/hCVSggyqIE
— Doordarshan National (@DDNational) April 30, 2020
रामायण सुरु झाल्यापासूनच सोशल मीडियावर त्यावरील फनी मीम्स, जोक्स व्हायरल होऊ लागले होते. आता रामायणाने विक्रम रचल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा भरभरुन वर्षाव होत आहे.
पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स:
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
रामायण मालिका पुन:प्रसारित व्हायला लागल्यानंतर सोशल मीडियावर त्यावरील मीम्स आणि जोक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे सर्वाधिक पाहिला गेलेला शो ठरल्यानंतर आता मीम्सचे रेकॉर्ड रामायण मोडले असे वाटल्यास वावगे ठरु नये.