Punyashlok Ahilyabai Serial (Photo Credits: Instagram)

सध्या मराठीसह हिंदी वाहिन्यांवर ऐतिहासिक कथांवर आधारित नवनव्या मालिका येत आहेत. मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावे अशा एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai ) होळकर यांच्या जीवनावर आधारित देखील मालिका लवकरच सुरु होते. 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' हे या हिंदी मालिकेचे नाव असून येत्या 4 जानेवरी 2021 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे. मुख्य म्हणजे या प्रोमोमध्ये अनेक मराठी चेहरे दिसत आहेत.

अहिल्याबाई होळकर यांची विजयगाथा, त्यांचे कर्तृत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही. मात्र आताच्या पिढीला आणि पुढील पिढीला या रणरागिनीचे महत्व पटवून देण्याचा उत्तम प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यात बालकलाकार अदिती जलतारे ही अहिल्याबाई यांची भूमिका साकारणार आहे. तर मराठी कलाकार राजेश श्रृंगारपूरे हा तिच्या सास-यांच्या भूमिकेत तर स्नेहलता वसईकर ही तिच्या सासूच्या भूमिकेत दिसणार आहे.

या छोट्या अहिल्याबाई होळकरांना पाहून मोठ्या अहिल्याबाई कोण असणार याचीही प्रेक्षकांनाही याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान 'माझ्या नव-याची बायको' फेम अभिजीत खांडकेकर याची पत्नी सुखदा हिने या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपला नवा कार्यक्रम येत असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्यामुळे सुखदा खांडकेकरचे या मालिकेत काय पात्र असणार याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.हेदेखील वाचा- Ram Setu: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अक्षय कुमार सिनेमाच्या शूटींगसाठी अयोध्येत जाणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Sukhada Khandkekar (@morpankh)

राणी अहिल्याबाई होळकर याचा पराक्रमी इतिहास सर्वांना छोट्या पडद्यावर पाहता येणार यामुळे प्रेक्षकही खूश आहे. आपल्या भारताचा इतिहास कधीही संपणार नाही इतका अगाध आहे. देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर, महान, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तर अनेकांना समाजातील बुरसटलेल्या प्रथा मोडून काढून समाजाला पुढे आणले. यात अहिल्याबाई होळकर यांचा देखील मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचा हा महान इतिहास प्रेक्षकांना 4 जानेवारी 2021 पासून टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. 4 जानेवारीपासून रोज संध्याकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर पाहता येणार आहे.