Maharashtra's Best Dancer Winner: Prathamesh Mane बनला 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर' शो चा विजेता; फोटो शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार
Maharashtra's Best Dancer Winner Prathamesh Mane (PC - Instagram)

Maharashtra's Best Dancer Winner Prathamesh Mane: महाराष्ट्रातील सर्व नृत्य प्रेमींची प्रतीक्षा अखेर रविवारी संपली आहे. 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर' (Maharashtra's Best Dancer) शोच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. मराठमोळ्या प्रथमेश माने (Prathamesh Mane) ने 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर' शोच्या विजेत्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. प्रथमेशने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रथमेशने या सर्वाचे श्रेय आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिलं आहे.

प्रथमेशने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'या सर्वांच श्रेय तुमचं आहे. इतक्या दिवसांपासून मी जे स्वप्न पाहत होतो, ते आज पूर्ण झालं आणि मी तुमच्या सर्वांची मने जिकंली आहेत. आज मला माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळाल्याचा मला आनंद वाटतोय. तुम्ही दिलेल्या मतांसाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. सर्वांसाठी हा विजय आहे,' असंही प्रथमेशने म्हटलं आहे. याशिवाय प्रथमेशने आकाश शेट्टी आणि अंकित मिश्रा यांचे खास आभार मानले आहेत. (वाचा - Kon Honaar Crorepati 2021 Registration: 'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 24 ते 2 एप्रिल दरम्यान होणार रजिस्ट्रेशन (Watch Video))

गेल्या काही दिवसांपासून सोनी मराठी चॅनेलवर 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर' शो सुरू होता. अखेर 14 मार्च रोजी या शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रथमेश मानेने या शो चे विजेतेपद पटकावले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमेशवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या रिअॅलिटी शोला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Mane (@prathameshmane_did)

दरम्यान, 'महाराष्ट्रज बेस्ट डान्सर' शो च्या ग्रँड फिनालेमध्ये प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि आदिती जाधव यांचा समावेश होता. ग्रँड फिनालेच्या निमित्ताने या शोमध्ये काही नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी उपस्थिती लावली होती.