Pavitra Rishta 2: सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा गाजलेला शो 'पवित्र रिश्ता'चा दुसरा सिझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला; जाणून घ्या डीटेल्स
Pavitra Rishta (Photo Credits: Twitter)

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांना झी टीव्हीचा लोकप्रिय शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) मधून मोठी ओळख मिळाली होती. टीव्ही जगतातील ही जोडी या मालिकेमुळे रातोरात स्टार झाली होती. 2009 साली ही मालिका सुरु झाली 2014 पर्यंत ती ऑनएयर होत होती. त्यावेळी यातील मानव-अर्चनासह इतरही पात्रे चाहत्यांच्या घरातील एक भाग बनले होते. शोचे चाहते अजूनही या मालिकेची आठवण काढतात. आता शो आणि कलाकारांची फॅन फॉलोव्हिंग पाहून निर्मात्यांनी शोचा दुसरा सीझन, म्हणजेच ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) आणण्याचा निर्णय घेतला आहे. होय, लवकरच 'पवित्र रिश्ता' चा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

पण यावेळी शोमध्ये एक ट्वीस्ट असणार आहे. एकता कपूर तिच्या सुपरहिट सीरियलचा दुसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे. दिग्दर्शक कुशाल झवेरी यांनी 'पवित्र रिश्ता 2’ वृत्तास दुजोरा दिला आहे. महत्वाचे म्हणजे अंकिता लोखंडे या शोचा एक भाग असणार असल्याचे कुशाल झवेरी यांनी सांगितले. अंकिताने स्वतः आपण हा शो करणार असल्याचे सांगितल्याची माहिती कुशाल यांनी दिली.

दिग्दर्शक कुशाल झवेरी असेही म्हणाले की, ‘माझ्या व्यतिरिक्त काही इतर दिग्दर्शकही त्या शोशी जोडले गेले होते. आता पुन्हा जर मला संधी मिळाली तर या प्रोजेक्टचा एक भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. जरी मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही तरी, हा शो मी नक्कीच पाहीन. अंकिता एक कसलेली अभिनेत्री आहे, ती जे काही करते ते 100% देऊन करते, त्यामुळे शोचे चाहते तिला परत पाहून आनंदित होतील.’ (हेही वाचा: Majha Hoshil Na मालिकेतील सई आणि आदित्य चा Valentine's Day दिवशी उडणार लग्नाचा बार, Watch Video)

तर अशा प्रकारे अंकिता ‘पवित्र रिश्ता सीझन 2’ च्या माध्यमातून डिजिटल पदार्पण करणार आहे. सध्या या शोच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. यासह आतापर्यंत फक्त अंकिताच या शोची हिस्सा होणार असल्याचे समोर आले. आता तिच्या विरुद्ध कोणता अभिनेता मुख्य भूमिका साकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.