OTT Releases Of The Week: नेटफ्लिक्सवर मनोज बाजपेयीच्या 'Ray' पासून, एमएक्स प्लेयरवर स्वप्निल जोशीच्या 'Samantar 2' पर्यंत या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे चित्रपट व सिरीज
Manoj Bajpayee’s Ray, Swwapnil Joshi’s Samantar, Kristen Bouchard’s Evil Season 2 Poster (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म (Ott-Platform) विश्वामध्ये मोठी क्रांती झाली. सध्या चित्रपटगृहे बंद असल्याने अशाच प्लॅटफॉर्मची चलती आहे. दर दिवशी कोणत्या ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सिरीज, चित्रपट अथवा नवीन सिझन प्रदर्शित होत असतो. आता जूनचा चौथा आठवडा सुरू होणार आहे. यासह बर्‍याच मोठ्या वेब सीरिजदेखील प्रदर्शित होण्यास तयार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच रिलीज झालेला विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. आता आम्ही या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या वेब सिरीज आणि चित्रपटांची एक यादी घेऊन आलो आहोत.

टू हॉट टू हँडल सीझन 2 (Too Hot To Handle Season 2)–

टू हॉट टू हँडल सीझन 2 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर 23 जून रोजी रिलीज होणार आहे. या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.  त्यानंतर आता त्याच्या दुसर्‍या सिझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

जून गुड ऑन पेपर (June Good On Paper)-

जून गुड ऑन पेपर हा आगामी अमेरिकन रोमँटिक विनोदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन किम्मी गेटवुडने केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 23 जून रोजी रिलीज होणार आहे. ही एका स्टॅन्ड-अप कॉमेडीअनची छोटी प्रेमकथा आहे.

ग्रहण (Grahan)-

ग्रहण ही वेब सिरीज आहे जी या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ही अ‍ॅक्शन क्राइम थ्रिलर मालिका आहे. ही मालिका बोकारोमधील शीखविरोधी दंगलींवर आधारीत आहे.

रजनीगंधा (Rajnigandha)–

रजनीगंधा हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये राजेश शर्मा, विभा आनंद, तरनजित कौर, अशोक पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहोत. हा चित्रपट 21 जून रोजी एमएक्स प्लेयरवर रिलीज होईल.

माडथी (Maadathy: An Unfairy Tale)-

माडथी ओटीटी प्लॅटफॉर्म नीस्ट्रीमवर 24 जून रोजी रिलीज होणार आहे. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि लॅटिन अमेरिकन फिक्की 60 यासह आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

एव्हिल सीझन 2 (Evil Season 2)-

एव्हिल सीझन 2 ही सिरीज वूटवर 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ही एक अमेरिकन हॉरर सिरीज आहे. एक मानसशास्त्रज्ञ आणि पाद्री चर्चमध्ये घडणाऱ्या घटनांची तपासणी करून, जे काही घडते त्यामागील तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताना यामध्ये दिसणार आहेत.

सेक्स/लाइफ (SEX/LIFE) -

सेक्स/लाइफ ही सिरीज नेटफ्लिक्सवर 25 जून रोजी प्रदर्शित होईल. ही एक कॉमेडी ड्रामा सिरीज अजून यामध्ये प्रेमाचा त्रिकोण दिसणार आहे.

धूप कि दिवार (Dhoop Ki Deewar) -

धूप कि दिवार ही सिरीज 25 जून रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अहद रझा मीर, सजल अली, झैब रहमान, सवेरा नदीम असे कलाकार आहेत. ही पाकिस्तानी सिरीज असून, ती भारत-पाकिस्तान तणावावर बेतलेली आहे. (हेही वाचा: Dhoom 4 मध्ये Salman Khan सोबत झळकणार Akshay Kumar? अक्षयने दिले 'हे' उत्तर)

रे (Ray) -

रे हा एक नेटफ्लिक्सवरील बहुप्रतीक्षित चित्रपट आहे, जो 25 जून रोजी प्रदर्शित होईल. यामध्ये मनोज बाजपेयी, गजराज राव, राधिका मदन, के के मेनन, हर्षवर्धन कपूर असे कलाकार आहेत. हा चित्रपट श्रीजित मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला यांनी दिग्दर्शित केला आहे. सत्यजित रे यांनी लिहिलेल्या चार लघु कथांवर हा चित्रपट आधारीत आहे.

समांतर सीझन 2 (Samantar-2) -

समांतर ही एमएक्स प्लेयरवरील मराठी सिरीज असून त्याचा दुसरा सिझन 24 जूनला प्रदर्शित होईल. या सिरीजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका आहेत. सतीश राजवाडेने याचे दिग्दर्शन केले आहे. समांतरच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, आता याच्या दुसऱ्या सिझनची उत्सुकता आहे.